‘विश्वास’च्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधीलकी जपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST2021-06-26T04:19:19+5:302021-06-26T04:19:19+5:30
ओळी : शिराळा येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त 'विश्वास' कारखान्यामार्फत आयाेजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. शिमोनी नाईक यांच्याहस्ते ...

‘विश्वास’च्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधीलकी जपली
ओळी : शिराळा येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त 'विश्वास' कारखान्यामार्फत आयाेजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. शिमोनी नाईक यांच्याहस्ते झाले. यावेळी राम पाटील, दत्तात्रय पाटील उपस्थित हाेते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र रक्ताची गरज असताना 'विश्वास'च्या कर्मचाऱ्यांनी अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने रक्तदान करून सामाजिक कार्य केले आहे, असे प्रतिपादन डॉ. शिमोनी विराज नाईक यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथील चिंतन मंडपात विश्वासराव नाईक साखर कारखान्यातर्फे झालेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कार्यकारी संचालक राम पाटील प्रमुख उपस्थित होते. शिबिरात १२५ दात्यांनी रक्तदान केले. डॉ. नाईक म्हणाल्या, शिराळा विधानसभा मतदारसंघात आमदार मानसिंगराव यांनी मोठे सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक कार्य उभारले आहे. सार्वजनिक विकासकामे राबविण्यात ते सर्वांत पुढे आहेत. सहकारात त्यांनी आदर्श प्रस्थापित केला आहे. नाईक घराण्यातील समाजकारणाचा वसा, वारसा ते नेटाने पुढे चालवत आहेत. कोरोना महामारीच्या काळात मतदारसंघात त्यांनी उभारलेले काम, निर्माण केलेल्या सोयी-सुविधा, लोकांना केलेली मदत, घेतलेली काळजी आदर्शवत आहे. अशा सतत समाजकार्यात व्यस्त असणाऱ्या नेत्याचा वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर घेऊन साजरा होतो, हे आदर्शवत आहे.
कामगार संघटनेचे उपाध्यक्ष विजय पाटील यांनी स्वागत केले. डॉ नाईक यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सचिव सचिन पाटील, डॉ. विक्रमसिंह गावडे, सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण रक्तपेढीचे डॉ. संदीप यादव, डॉ. संध्या पाखले, विवेक चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तसंकलन केले. एम. आर. पाटील यांनी आभार मानले.