शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

जतमध्ये एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 7:21 PM

जत : जत शहरातील मरगुबाई गल्ली येथील अश्वीन भीमराव सनदी (वय ४१) याने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतु घरगुती कारणांमुळे त्याने आत्महत्या केली आहे, अशी चर्चा येथे सुरू होती. याप्रकरणी अरुण भीमराव सनदी (रा. मेंढीगिरी, ता. ...

जत : जत शहरातील मरगुबाई गल्ली येथील अश्वीन भीमराव सनदी (वय ४१) याने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतु घरगुती कारणांमुळे त्याने आत्महत्या केली आहे, अशी चर्चा येथे सुरू होती. याप्रकरणी अरुण भीमराव सनदी (रा. मेंढीगिरी, ता. जत) यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

अश्वीन सनदी हे जत एसटी आगारात हेल्पर म्हणून काम करत होते. त्यांनी रजा काढल्याने ते शुक्रवारी कामावर गेले नव्हते. त्यांचे गाव मेंढीगिरी आहे. नोकरीनिमित्त भाड्याने खोली घेऊन ते सहकुटुंब मरगुबाई गल्लीत राहत होते. त्यांना दोन मुले आहेत. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्यादरम्यान घरात कोणी नसल्याचे पाहून त्यांनी विषारी औषध प्राशन केले होते. ही घटना तेथील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर उपचारासाठी त्यांना मिरज येथे घेऊन जात असताना कळंबी (ता. मिरज) जवळ रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जत पोलीस करत आहेत.