शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बदली होत नसल्याने एसटी कर्मचाऱ्याने संपवले जीवन, सांगली जिल्ह्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 17:07 IST

आगारप्रमुखावर कारवाईची मागणी

मिरज : कवठेमहांकाळ एसटी आगारातील सहायक जावेद अल्लाबक्ष नगारजी (वय ३८, रा. जत) या एसटी कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. आगार व्यवस्थापकांनी बदलीचा अर्ज अडवून ठेवल्याने आत्महत्या करीत असल्याचे नगारजी यांनी जिल्हा नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी संबंधित एसटी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा संतप्त नातेवाइकांनी घेतला होता.जावेद नगारजी हे कवठेमहंकाळ एसटी आगारात कार्यशाळेत सहायक म्हणून काम करीत होते. अडीच वर्षांपूर्वी नगारजी यांची जत येथून कवठेमहांकाळ येथे बदली झाली होती. बदलीमुळे नाराज झालेल्या नगारजी यांनी जत येथे पुन्हा बदलीसाठी कवठेमहांकाळ आगारप्रमुख महेश जाधव यांच्याकडे दोनवेळा विनंती अर्ज केले होते.

मात्र, दिलेले अर्ज जिल्हा नियंत्रकांकडे पाठविले नसल्याने बदली होत नसल्याची नगारजी यांची तक्रार होती. त्यातच आगारप्रमुख व हेड मेकॅनिक यानी नगारजी यांना आठ दिवस निलंबित केले होते. त्यामुळे ते अस्वस्थ होते. त्यांनी दि. १६ रोजी एसटी जिल्हा नियंत्रकांकडे अर्ज केला होता. त्यात माझ्या बदलीसाठी केलेला अर्ज आपल्याकडे पाठविला नसल्याची व आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या कारणामुळे आत्महत्या करणार आहे. मला न्याय मिळावा, असे म्हटले आहे. या अर्जाच्या प्रति नगारजी यांनी काही मित्रांना पाठविल्या. रविवारी कवठेमहांकाळ आगारात येऊन विष प्राशन केले. नगारजी यांना मिरज सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. नगारजी यांच्या मृत्यूमुळे संतप्त नातेवाइकांनी संबंधित एसटी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. जावेद नगारजी यांच्या आत्महत्येचे वृत्त समजतात एसटी कर्मचारी व भीम आर्मीचे जैलाब शेख यांनी सिव्हिलमध्ये धाव घेतली. नगारजी यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस