शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

Sangli: वॉचमनच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत रोवला यशाचा झेंडा, सृष्टीने मिळवले ९७.४० टक्के गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 18:03 IST

दिवसभर ड्युटी करून आलेल्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले

प्रताप महाडिककडेगाव (जि. सांगली) : परिस्थिती कितीही कठीण असली अन् वाटेत कितीही अडथळे आले तरी कष्टाच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते. ही गोष्ट चिंचणी (ता. कडेगाव) येथील शिवाजी हायस्कूलची विद्यार्थिनी सृष्टी अनिल महाडिक हिने सत्यात उतरविली आहे. दहावीच्या परीक्षेत ९७.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात तिने प्रथम क्रमांक पटकावला.सृष्टीचे वडील अनिल महाडिक हे सोनहिरा सहकारी साखर कारखान्यात वॉचमन म्हणून कार्यरत आहेत. पूर्वीची शेती तलावासाठी संपादित झाली. उरलेली थोडीशी शेती आणि वडिलांची वॉचमनची नोकरी यावर त्यांचे घर चालत होते. आई, वडील भावासह ११ जणांचे त्यांचे एकत्र कुटुंब आहे. आई दीपाली या गृहिणी असून, घरची जबाबदारी आणि शेतातली कामे दोन्ही सांभाळतात.घरात यापूर्वी कोणाचेही उच्च शिक्षण झालेले नाही; पण मुलांमध्ये ज्ञानाची जिद्द आहे. सृष्टीची मोठी बहीण इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकते आणि आता सृष्टीने हे अपूर्व यश मिळवून महाडिक कुटुंबाच्या संघर्षावर सोनेरी झालर घातली आहे.दिवसभर ड्युटी करून आलेल्या वडिलांच्या डोळ्यात मंगळवारी आनंदाश्रू तरळले. लेकीने गरिबीचे चटके सोसत मेहनतीने उजळून टाकलेलं स्वप्न त्यांचा ऊर अभिमानाने भरून टाकणारे ठरले. घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर तिने आनंद फुलवला. यशाचे इमले सर करीत तिने खूप मोठे व्हावे, असा आशीर्वाद तिच्या वडिलांनी तिला दिला.

टॅग्स :SangliसांगलीSSC Resultदहावीचा निकाल