शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वक्तृत्व, चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: October 19, 2015 23:45 IST

सांगलीत ‘लोकमत’चे आयोजन : महापालिका क्षेत्रातील वृत्तपत्र विक्रेते, कुटुंबियांसाठी उपक्रम

सांगली : सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशन आणि ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेले वृत्तपत्र विक्रेते व त्यांच्या मुलांसाठी रविवारी चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा झाल्या. येथील दामाणी हायस्कूलमध्ये झालेल्या या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.चित्रकला स्पर्धा पहिली ते पाचवी व सहावी ते दहावी, अशा दोन गटात घेण्यात आल्या. पहिली ते पाचवी गटातून शिवानी आनंद मोरे हिने प्रथम, तन्वी प्रशांत जगताप हिने द्वितीय, तर चैत्र भूषण मांजरेकर याने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच अभिजित अनिल रूपनर, वरद गजानन बंडगर, सुदर्शन गजानन बंडगर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. सहावी ते दहावी गटातून प्रणव विकास सूर्यवंशी याने प्रथम, राधिका रवींद्र पाटील हिने द्वितीय, तर दुर्गेश सचिन चोपडे याने तृतीय क्रमांक पटकावला. शर्वरी सुधाकर चव्हाण, संकेत संजय उपळावीकर, हर्ष प्रदीप माने यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.वक्तृत्व स्पर्धा सहावी ते दहावी व खुला, अशा दोन गटात घेण्यात आल्या. सहावी ते दहावी गटातून राधिका रवींद्र पाटील हिने प्रथम, दुर्गेश सचिन चोपडे याने द्वितीय, तर श्रुती सुधाकर चव्हाण हिने तृतीय क्रमांक पटकावला. या गटातून वैष्णवी संजय मोरे व मानसी मनोहर गडसी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. खुल्या गटातून अभिषेक विकास कुलकर्णी याने प्रथम, विकास सूर्यवंशी यांनी द्वितीय, तर मारुती नवलाई यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सचिन चोपडे, अजय भंडारी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.चित्रकला स्पर्धेसाठी पी. डी. पाटील, व्ही. आर. पाटील, अश्विनी गायकवाड यांनी, तर वक्तृत्व स्पर्धेसाठी भूषण मांजरेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांना ‘लोकमत’च्यावतीने जिल्हा वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्याहस्ते रोख पारितोषिक, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सचिन चोपडे यांनी स्वागत केले. विकास सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी श्रीपाद पाटील, प्रताप दुधारे, दत्तात्रय सरगर, दरिबा बंडगर, अनिल रूपनर, कैलास सूर्यवंशी, राम कुंभार, सुधीर दप्तरदार, रवींद्र पोटे, विनोद माने, विनोद गायकवाड, बसाप्पा पट्टणशेट्टी, सुजाता रवींद्र पाटील, त्रिवेणी सचिन चोपडे, प्रतीक्षा विनोद माने यांच्यासह सांगली, मिरज, कुपवाड परिसरातील वृत्तपत्र विक्रेते व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशाल रासनकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘लोकमत’मुळे विक्रेत्यांना स्वत:ची नवी ओळख‘लोकमत’ने आजवर वृत्तपत्र विक्रेत्यांना केंद्रस्थानी मानून त्यांच्यासाठी, तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम, सहल, महिला व ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव, आरोग्य शिबिर, स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांना स्वत:ची एक नवी ओळख मिळाल्याची भावना अनेक विक्रेत्यांनी यावेळी व्यक्त केली.