शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: कुटुंबात अनोखी आघाडी!, आई काँग्रेसच्या नेत्या, मुलीच्या खांद्यावर राष्ट्रवादीची धुरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 12:54 IST

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्षपदी सोनिया सत्यजित होळकर 

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्षपदी सोनिया सत्यजित होळकर यांची बुधवारी निवड करण्यात आली. सोनिया होळकर या सांगलीचे दिवंगत काँग्रेस नेते मदन पाटील यांच्या कन्या आहेत. आई जयश्रीताई पाटील यासुद्धा काँग्रेसच्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात अनोखी आघाडी नोंदली गेली आहे. सोनिया यांची निवड सांगलीच्या राजकीय पटावर सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात बुधवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याहस्ते होळकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नाशिकचे निरीक्षक आमदार सुनील भुसारा, गोकुळ पिंगळे, दत्तात्रय पाटील उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले की, पक्ष बळकटीसाठी तसेच पक्ष मजबूत करण्यासाठी सोनिया होळकर चांगले कार्य करतील, असा विश्वास वाटतो.सोनिया होळकर सध्या नाशिक येथे सासरी राहतात. कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावच्या संचालकपदी त्या कार्यरत आहेत. राष्ट्रवादीच्या नाशिक शहर युवती आघाडीचे नेतृत्व त्यांनी केले आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी मंत्री मदन पाटील यांच्या त्या कन्या आहेत. सोनिया यांच्या आई जयश्रीताई पाटील सध्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा व काँग्रेसच्या नेत्या म्हणून सांगलीतील राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

जयंत पाटील व मदन पाटील यांच्यात पूर्वी राजकीय संघर्ष होता. मात्र सांगली जिल्हा बँकेच्या एका निवडणुकीत हे दोन्ही नेते एकत्र आले होते. मदन पाटील यांनी राष्ट्रवादीत यावे म्हणून जयंत पाटील यांनी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना यश आले नाही. मदन पाटील यांच्या पश्चात जयश्रीताई पाटील यांनाही राष्ट्रवादीमध्ये घेण्यासाठी जयंत पाटील यांच्याकडून प्रयत्न झाले होते. मात्र, जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आता मदन पाटील यांच्या कन्येला महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर या निवडीची चर्चा राजकीय पटावर रंगली आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलRohini Khadseरोहिणी खडसे