शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: म्हैसाळ योजनेचे पाणी अन् विजेचा प्रश्न निकाली काढा, डफळापुरात सांगली मार्ग रोखला; दोन तास वाहतूक ठप्प 

By श्रीनिवास नागे | Updated: July 19, 2023 15:44 IST

जत : म्हैसाळ योजनेचे पाणी डफळापुर भागात सोडावे व विजेचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, यामागणीसाठी आज, बुधवारी सकाळी डफळापूर ...

जत : म्हैसाळ योजनेचे पाणी डफळापुर भागात सोडावे व विजेचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, यामागणीसाठी आज, बुधवारी सकाळी डफळापूर (ता. जत) येथे बसस्थानकाजवळील रस्त्यावर रास्तारोको आंदोलन झाले. सुमारे दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते मन्सूर खतीब यांनी केले.राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर भाई खतीब यांच्या नेतृवाखाली डफळापूर येथे जत सांगली मार्ग रोखून धरला. या आंदोलनात २० गावातील शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे सांगली मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. १४० विसर्गाने या भागाला पाणी मिळावे अशी जोरदार मागणी करत, जिरग्याल, एकुंडी, मिरवाड, वज्रवाड या भागाला प्रधान्याने पाणी मिळाले पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पाऊस नसल्याने पिके वाळून गेली आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध नाही.  त्यामुळे म्हैसाळ योजना चालू करून तालुक्यातील तलावात पाणी सोडण्यात यावे, कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने  विजेच्या मोटरी जळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पूर्ण क्षमेतेने वीज पुरवठा व्हावा, ऊस व विविध पिकांचे पंचनामे करून एकरी २५ हजार अनुदान द्यावे, प्रती जनावरे १५० रुपये एका जनावरांसाठी चारा रक्कम पशुपालकांच्या खात्यावर जमा करावी अथवा चारा डेपो, छावणी सुरू करावी, बिळूर कालवा २ मध्ये म्हैसाळसाठी ज्या जमिनी संपादित केल्या आहेत त्या शेतकऱ्यांचे पैसे तातडीने द्यावेत. अंकले येथील वीज उप केंद्राचे काम तातडीने सुरु करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनकर्त्यांनी दिलेले निवेदन मंडल आधिकारी अंजली निमासोडे व वीज मंडळाचे कनिष्ठ अभियंता सुहास काळे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, संचालक मन्सूर खतीब, जिरग्याळच्या सरपंच सारिका पाटील, उपसरपंच सुनंदा कोरे, शिंगणापूरच्या सरपंच मनीषा पाटील, उपसरपंच अलका पांढरे, मिरवाडच्या सरपंच पप्पूबाई सौदी, डफळापूरचे माजी उपसरपंच शंकर गायकवाड, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलन