शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जवान सुटी अर्ध्यातच संपवून सीमेवर परतले, सांगली जिल्ह्यातील ३० हजार सैनिक भारतमातेच्या रक्षणासाठी २४ तास कर्तव्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 13:16 IST

सांगली : ‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी’ या गदिमा यांनी लिहिलेल्या गीताच्या ओळी सध्याच्या युद्धजन्य ...

सांगली : ‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी’ या गदिमा यांनी लिहिलेल्या गीताच्या ओळी सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत आठवल्या जात आहेत. कारण जिल्ह्यातील शेकडो नव्हे तर जवळपास ३० हजार सैनिक देशरक्षणार्थ कर्तव्य बजावत आहेत. त्यातील कित्येक जण सीमेवर अहोरात्र पहारा देत आहेत.पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटक ठार झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. समाज माध्यमातूनही ‘पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांना मारा’ अशा ‘पोस्ट’ चा भडीमार सुरू होता. तशातच ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला. दुसरीकडे पाकिस्तानने त्यांच्या संरक्षण दलाला प्रत्युत्तर देण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे युद्धाचे सावट दिसून येते. जिल्ह्यात सुटीवर आलेल्या अनेक जवानांना माघारी बोलवण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व जवान सुटी अर्ध्यातच संपवून सीमेवर परतले आहेत. त्यांना निरोप देताना कुटुंबीयांना गलबलून आले.सुटीवर आलेले जवान परत गेल्यामुळे तसेच सध्या सीमेवर असलेल्या जवानांच्या कुटुंबीयांमध्ये युद्धाबाबतच्या अनामिक भीतीचे सावट आहे. समाज माध्यमावर सैनिक सीमेवर जात असल्याचे भावुक व्हिडीओ पाहून अनेकांना जीव तुटत आहे. सैनिक मात्र देशसेवेसाठी अभिमानाने कर्तव्यावर रूजू होण्यासाठी जाताना दिसत आहेत. युद्धाच्या परिस्थितीत कोणतीही वाईट बातमी कानावर पडू नये अशी प्रार्थना सैनिकांचे कुटुंब मनोमन करत आहेत.स्वातंत्र्यापूर्वी क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. आता सैनिकांचा जिल्हा म्हणूनही सांगलीला ओळखले जाते. जिल्ह्यातील जवळपास ३० हजार सैनिक देशसेवेसाठी कर्तव्यावर आहेत. त्यापैकी हजारो सैनिक सद्यस्थितीत सीमेवर आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचे सर्व लक्ष सीमेवरील हालचालीकडे आहे. सैनिकाची पत्नी, आई, वडील, मुले, नातेवाईक काळजीत आहेत. त्यांची हूरहूर, काळजी पाहून नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारील मंडळी त्यांना धीर देताना दिसत आहेत. गदिमांच्या गीतातील ‘वावरतो फिरतो आम्ही नित्यकर्म अवघे करतो, राबतो आपुल्या क्षेत्री चिमण्यांची पोटे भरतो, परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी’ अशीच अनेकांची अवस्था आहे.

पराक्रमी शूरवीरांचा जिल्हाभारत-पाक, भारत-चीन युद्धासह वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये जिल्ह्यातील वीर जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवले आहे. आजवर १६० जवान देशरक्षणार्थ शहीद झाले आहेत. ७० जणांना शौर्यपदक मिळाले. एक महावीर चक्र, एक शौर्य चक्र, ३१ सेना / नौसेना / वायूसेना पदके प्राप्त केली आहेत.

२० हजार माजी सैनिकजिल्ह्यात सद्यस्थितीत १४ हजार ६७५ सैनिक देशाचे रक्षण करून निवृत्त झालेले आहेत. तसेच ६ हजार ९९ सैनिकांच्या विधवा कुटुंबांची जबाबदारी सांभाळत आहेत. तर जवळपास ३० हजार सैनिक कर्तव्यावर असल्याची माहिती जिल्हा सैनिक कार्यालयातून देण्यात आली.

टॅग्स :SangliसांगलीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान