शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

जातपंचायतीचा निर्णय अमान्य, आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवरील बहिष्कार कायम; जातपंचांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 6:06 PM

नंदिवाले समाजातील जातपंचायतींने कराड येथे घेतलेला निर्णय अमान्य

सांगली : नंदिवाले समाजातील जातपंचायतींने कराड येथे घेतलेला निर्णय अमान्य करून आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवरील सामाजिक बहिष्कार सुरू ठेवणार असल्याचे समाजातील काहींनी जाहीर केले. पलूस येथील झालेल्या या निर्णयाविरोधात इस्लामपूर येथील आंतरजातीय विवाह केलेले प्रकाश शंकर भोसले यांनी पलूस पोलीस स्टेशनमध्ये काल, शुक्रवारी (दि.१४) याप्रकरणी फिर्याद दाखल केली. या तक्रारीवरुन सहा पंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जातपंचायतीचे पंच - विलास शंकर भिंगार्डे, चंद्रकांत बापू पवार (दोघे रा. इस्लामपूर), शामराव श्रीरंग देशमुख, अशोक शंकर भोसले (दोघे रा. दुधोंडी), किसन रामा इंगवले (जुळेवाडी, ता. कराड), विलास बापू मोकाशी (नेहरूनगर, निमणी) या पंचांवर सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार पलूस पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे. महाराष्ट्रातील नंदिवाले काशी कापडी या समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. अशा अंदाजे 150 जोडप्यांना नंदिवाले जातपंचांनी समाजातून बहिष्कृत केले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी नंदिवाले समाजातील जातपंचांशी संपर्क करून त्यांची मेढा (जि. सातारा) पोलीस स्टेशनमध्ये बैठक बोलावून त्यांची समजूत काढून बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली. तेव्हा पंचांनी सामाजिक बहिष्कार मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र काहींनी याला विरोध केला.याप्रकरणी काही पीडित जोडप्यांनी याविरोधात पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. यातील फिर्यादी प्रकाश भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहून जो सामाजिक बहिष्कार टाकला आहे. त्याच्या त्रासाची आपबीती पत्रकारांना सांगितली. सदर प्रकरणाचा पाठपुरावा करून गुन्हा नोंद करण्यासाठी सातारा अंनिसचे कार्यकर्ते शंकर कणसे, प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, वंदना माने, डॉ. दीपक माने, अ‍ॅड. हौसेराव धुमाळ, मोहसीन शेख यांचे बहुमोल सहकार्य झाले.गुन्हा नोंद करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पलूस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजश्री दुधाळ, हवलदार नितीन गोडे यांचे बहुमोल सहकार्य लाभले. पत्रकार परिषदेला सांगली अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, फारूक गवंडी, डॉ. सविता अक्कोळे, बाबुराव जाधव, वासुदेव गुरव, त्रिशला शहा इत्यादी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी