शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांचा ‘करेंगे या मरेंगे’चा नारा

By admin | Updated: August 10, 2015 00:56 IST

चांदोलीत प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा : दहा हजार कोटींच्या निधीची मागणी

वारणावती : येत्या जानेवारी २०१६ अखेर शेतीला कालवे व पोटकालवे निर्मितीसाठी २० हजार कोटी आणि पुनर्वसनासाठी १० हजार कोटींची तरतूद केली नाही, तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. श्रमिक मुक्ती दल, धरण व प्रकल्पग्रस्त आणि लाभक्षेत्रातील शेतकरी ‘करेंगे या मरेंगे’चा एल्गार सुरू करतील, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. चांदोली (ता. शिराळा) येथे वारणा धरणाचे प्रवेशद्वार येथे धरण व प्रकल्पग्रस्त आणि लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मोर्चासमोर ते बोलत होते. मणदूर येथील हुतात्मा स्मारकामध्ये क्रांतिवीरांना वंदन करून मोर्चास प्रारंभ झाला. मणदूरपासून आंदोलनकर्ते चालत मोर्चाने वारणा धरणाकडे गेले. प्रवेशद्वाराजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्च्यात सुमारे एक हजारावर प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील शेतकरी सहभागी झाले होते. डॉ. पाटणकर म्हणाले, उजनी, कोयना, वर्धा, जायकवाडी, उरमोडी, तारळी, वारणा, दूधगंगा धरणांतून शेतीला पाटाने पाणी मिळाले पाहिजे. १०० टक्के शेती सिंचनाखाली आली पाहिजे. तसेच राज्यातील धरण व प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गतिशील पावले उचलली पाहिजेत. हा दुसऱ्या स्वातंत्र्याचा एल्गार असून श्रमिक मुक्ती दलाने दिलेल्या आराखड्याचा विचार होऊन त्यावर चर्चा झाली पाहिजे. शेतीला नियमित पाणी दिले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. हे जमले नाही, तर सरकारला राज्यातील शेतकरी, धरण व प्रकल्पग्रस्त ‘चले जाव’चा इशारा देऊन ‘करेंगे या मरेंगे’चा एल्गार आझाद मैदानावर सुरू करतील. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे सदस्य दिलीप पाटील, वसंत पाटील, मारुती पाटील, लाभक्षेत्रातील शेतकरी विष्णू पाटील यांची भाषणे झाली. यावेळी पाटबंधारे विभाग, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक संग्राम शेवाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ‘श्रमुद’चे डी. के. बोडके, नजीर चौगुले, पांडुरंग कोठारी, शंकर पाटील, आनंदा वकटे, संतोष गोटल, शिवाजी पाटील, शिवाजी जाधव, वसंत पाटील आदींनी मोर्चाचे संयोजन केले. (वार्ताहर)घोषणाबाजी...रफिक आत्तार, भागोजी बोडके यांनी चळवळीची गाणी गाऊन मोर्चात रंगत आणली. सकाळी ११ पासून आंदोलनकर्ते ‘सरकार चले जाव, करेंगे या मरेंगे, शेतीला पाटाचे पाणी मिळालेच पाहिजे, शंभर टक्के जमीन देऊन लाभक्षेत्रात पुनर्वसन झालेच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे, लाभक्षेत्रातील शेतीला कालवे-पोटकालवे काढून पाणी मिळाले पाहिजे’, अशा घोषणा देत होते.