सांगलीत उपनिरीक्षकासह सहा पोलिसांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:31 IST2020-07-23T15:26:41+5:302020-07-23T15:31:06+5:30

सांगलीत सुरू करण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये पोलीस उपनिरीक्षकासह दोन वाहतूक पोलिसांना आणि आटपाडी येथील तीन पोलिसांना कोरोणाची लागण झाल्याचे गुरुवारी दुपारी स्पष्ठ झाले. मिरज येथील महिला पोलिस अधिकाऱ्याला या अगोदरच कोरोणाचे निदान झाले होते.

Six policemen, including a Sangli sub-inspector, were infected with corona | सांगलीत उपनिरीक्षकासह सहा पोलिसांना कोरोनाची लागण

सांगलीत उपनिरीक्षकासह सहा पोलिसांना कोरोनाची लागण

ठळक मुद्देसांगलीत उपनिरीक्षकासह सहा पोलिसांना कोरोनाची लागणकोरोना निदान झाल्याने पोलीस दलात खळबळ

सांगली: सांगलीत सुरू करण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये पोलीस उपनिरीक्षकासह दोन वाहतूक पोलिसांना आणि आटपाडी येथील तीन पोलिसांना कोरोणाची लागण झाल्याचे गुरुवारी दुपारी स्पष्ठ झाले. मिरज येथील महिला पोलिस अधिकाऱ्याला या अगोदरच कोरोणाचे निदान झाले होते.

सांगली शहरात महापालिकेच्या वतीने रॅपिड टेस्ट करण्यात येत आहेत. यात गुरुवारी शहरातील पोलिसांची चाचणी करण्यात आली यात पोलीस उपनिरीक्षक आणि वाहतूक पोलिसांचा अहवाल आला आहे. यासह आटपाडी येथील पोलिसांनाही कोरोना निदान झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा, प्रशासनाशी समन्वय व इतर माहिती संकलनासाठी जिल्हा परिषदेत सुरू करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातच आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या कक्षात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

बुधवारी सांगलीच्या शासकीय रूग्णालयातील ११ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचे निदान झाले होते. त्यात आता कोरोनाचे कामकाज चालणाऱ्या नियंत्रण कक्षातच झालेल्या शिरकावामुळे सतर्कता बाळगली जात आहे. या कक्षातील आणखी दोन अधिकाऱ्यानाही तापाची लक्षणे असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Six policemen, including a Sangli sub-inspector, were infected with corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.