शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सहा कोटीचे व्यवहार ठप्प

By admin | Updated: August 22, 2014 00:53 IST

एलबीटी प्रकरण : कर भरण्यासाठी पालिकेकडे गर्दी

सांगली : महापालिकेने एलबीटी वसुलीसाठी ३५ व्यापाऱ्यांची बँक खाती सील केल्याने या व्यापाऱ्यांचे सुमारे पाच ते सहा कोटीचे व्यवहार थांबले आहेत. बहुतांश बँकांनी या व्यापाऱ्यांची खाती गोठविली आहेत. पालिकेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आज (गुरुवारी) दिवसभरात कराचा भरणा करण्यासाठी व्यापाऱ्यांची रीघ लागली होती. उपायुक्त व एलबीटी कार्यालयात नोंदणी व बँक चलनासाठी व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी शंभर व्यापाऱ्यांची खाती गोठविण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तब्बल दीड वर्षानंतर महापालिकेने एलबीटी वसुलीसाठी प्रथमच आक्रमक पवित्रा घेत ३५ व्यापाऱ्यांची खाती सील करण्याचे आदेश विविध बँकांना दिले. या व्यापाऱ्यांच्या बँक खात्यांची माहिती विक्रीकर विभागाकडून घेण्यात आली होती. पालिकेचे पत्र मिळताच बहुतांश बँकांनी व्यापाऱ्यांच्या खात्यावरील व्यवहार थांबविले आहेत, तर काही बँकांनी प्रक्रिया सुरू केली आहे. बँकांना खाती सील करण्याची नोटीस दिल्यानंतर पालिकेने संबंधित व्यापाऱ्यांनाही नोटीस बजाविली आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांचे सुमारे पाच ते सहा कोटीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. पालिकेने आणखी शंभर व्यापाऱ्यांची यादी तयार केली आहे. यात एलबीटीची नोंदणी व कर भरणा न केलेल्यांचा समावेश आहे. या व्यापाऱ्यांची खाती सील करण्याचे आदेश आयुक्तांच्या सहीने तयार करण्यात आले आहेत. येत्या चार दिवसात स्वतंत्र पथके तयार करून ही खाती सील करण्याच्या नोटिसा बजावल्या जाणार आहेत. महापालिकेने बँक खाती सीलचे आदेश दिल्याने व्यापाऱ्यांत खळबळ उडाली. गुरुवारी दिवसभर एलबीटी व उपायुक्तांच्या कार्यालयात व्यापाऱ्यांची रीघ लागली. उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या कार्यालयात अनेक व्यापाऱ्यांनी संपर्क साधून कर भरण्याचे चलन नेले. एलबीटी कार्यालयातूनही शंभरहून अधिक व्यापाऱ्यांनी कर भरण्यासाठी बँक चलन नेले आहे. त्याचवेळी नोंदणी न केलेल्या व्यापाऱ्यांची अर्ज नेण्यासाठी धावपळ सुरू होती. एलबीटी अधीक्षक एस. जी. मुजावर यांनी नोंदणी व कर भरणारे, नोंदणी करूनही कर न भरणारे, अशा द्विस्तरीय पातळीवर कारवाईचा बडगा उगारला आहे. येत्या काही दिवसांत आणखी व्यापाऱ्यांना सुनावणीसाठी नोटिसा बजाविल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)