शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Maharashtra ११८४ प्रवासी आनंदी, निघाले आपल्या गावी : मिरजेतून गोरखपूरला श्रमिक स्पेशल रेल्वे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:17 IST

ओळखपत्र नसल्याने, तसेच तापमान जास्त असल्याने काहीजणांना रेल्वेत प्रवेश देण्यात आला नाही. पोलीस बंदोबस्तात सर्वांना रेल्वे बोगीत बसविण्यात आले. नोंदणी केलेल्या कामगारांशिवाय कोणीही रेल्वेत घुसणार नाही, याची खबरदारी रेल्वे पोलीस व सुरक्षा दलाने घेतली होती.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील अन्य जिल्ह्यातील प्रवाशांना गोरखपूर येथून अन्यत्र पाठविण्याची सोय करणार आहे.

मिरज : उत्तर भारतीयांना त्यांच्या गावी परत पाठविण्यासाठी रविवारी रात्री मिरज रेल्वे स्थानकातून उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे श्रमिक विशेष रेल्वे रवाना झाली. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याहस्ते कामगारांना रेल्वे तिकिटे व भोजन देण्यात आले. प्रत्येक बोगीत ५२ प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली होती. एकूण ११८४ प्रवासी या रेल्वेतून रवाना झाले.

सायंकाळपासून परप्रांतीय प्रवाशांना बसमधून रेल्वे स्थानकाकडे आणण्यात आले. एका बसमध्ये पंचवीस प्रवासी, याप्रमाणे दोन बसेसना एका नोडल अधिका-याची नियुक्ती करण्यात आली होती. १६ नोडल अधिका-यांनी ३२ बसेसमधून नोंदणीकृत ११८४ प्रवाशांना रेल्वे स्थानकात आणले. स्थानिक पोलिसांचा रेल्वे स्थानकाबाहेर बंदोबस्त होता. महसूल अधिका-यांनी रेल्वे स्थानकात प्रवेशापूर्वी प्रवाशांच्या ओळखपत्राची तपासणी केली. ओळखपत्र नसल्याने, तसेच तापमान जास्त असल्याने काहीजणांना रेल्वेत प्रवेश देण्यात आला नाही. पोलीस बंदोबस्तात सर्वांना रेल्वे बोगीत बसविण्यात आले. नोंदणी केलेल्या कामगारांशिवाय कोणीही रेल्वेत घुसणार नाही, याची खबरदारी रेल्वे पोलीस व सुरक्षा दलाने घेतली होती.

प्रवाशांना रेल्वे तिकिटासोबत दोन पाण्याच्या बाटल्या व जेवणासह पुढील ३० तासांच्या प्रवासासाठी गूळपोळी, थालीपीठ  देण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रणजित देसाई, पोलीस उपअधीक्षक संदीपसिंह गील यांच्यासह पोलीस व रेल्वे अधिकारी उपस्थित होते. गोरखपूरसाठी दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असून, मिरजेतून रविवारी पहिली रेल्वे रवाना झाली. मंगळवारी दुसरी रेल्वे पाठविण्याची तयारी सुरु आहे. थेट गोरखपूरपर्यंत जाणारी रेल्वे वाटेत कोठेही थांबणार नाही किंवा कोणत्याही प्रवाशाला वाटेत उतरू देणार नाही. उत्तर प्रदेशातील अन्य जिल्ह्यातील प्रवाशांना गोरखपूर येथून अन्यत्र पाठविण्याची सोय करणार आहे.

विश्वजित कदम यांचा पुढाकारजिल्ह्यात हजारो परप्रांतीय मजूर गावाकडे जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यापैकी उत्तर भारतीयांची संख्या मोठी असल्याने गोरखपूरपर्यंत मिरजेतून दोन विशेष रेल्वेंचे प्रशासनातर्फे नियोजन केले आहे. विशेष रेल्वेची प्रत्येकी साडेनऊ लाख रुपये खर्चाची व्यवस्था मंत्री विश्वजित कदम यांनी केल्याने मजुरांना दिलासा मिळाला. मंत्री विश्वजित कदम, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जितेश कदम यांनी प्रवाशांची विचारपूस केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार परप्रांतीयांच्या रेल्वे तिकिटाची व भोजनाची व्यवस्था केल्याचे कदम यांनी सांगितले.

 

टॅग्स :SangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस