शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

Sangli Politics: आगामी काळात जयंत पाटील यांची भूमिका काय ?, शिंदेसेनेची ऑफर असल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 18:19 IST

अजित पवार यांनीही विधानसभेत टोकले 

अशोक पाटीलइस्लामपूर : राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. यावेळी अभिनंदनाच्या ठरावावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी भाषण केले. त्यावेळी पाटील यांनी मी १९९० साली आमदार म्हणण्याऐवजी चुकून अध्यक्ष म्हणून सभागृहात आलो, असा शब्द वापरला. त्यावर हस्तक्षेप करीत अजित पवार यांनी आमदार म्हणा, असे टोकले. यावर जयंत पाटील यांनी दादांचे माझ्यावर किती लक्ष आहे बघा, असा टोला मारला, तसेच योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ, असा खुलासा केला. यावर आगामी काळात पाटील यांची भूमिका काय असणार? याची इस्लामपूर मतदारसंघात चर्चा सुरू झाली.विधानसभेच्या सभागृहात आमदार जयंत पाटील यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असा आपल्या पक्षाचा नियम असल्याचे म्हटले. त्यावरून राष्ट्रवादी गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यावर शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी जयंत पाटील यांना शिंदेसेनेची ऑफर दिली. त्यामुळे जयंत पाटील यांची पुढील भूमिका काय असेल? यावर राजकीय वर्तुळातून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान, शिंदेसेनेच्या काही नेत्यांनी पाटील यांच्याशी संपर्क साधून शिवसेनेची ऑफर दिल्याचेही खात्रीशीर वृत्त आहे. विधानसभा निवडणूक निकालापासून आमदार जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. थेट विधानसभा गृहात आपली उपस्थिती दाखवत काही गोष्टींचा उलगडा त्यांनी केल्याचे स्पष्ट होत चालले आहे. इस्लामपूर मतदारसंघातून आठव्यांदा निवडणूक लढवली असली, तरी मतांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याची सल पाटील यांच्या मनाला लागली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांतही शांतता आहे.

मतदारसंघाचे राजकारण निर्णायक वळणार..आगामी काळात आमदार जयंत पाटील यांचा काय निर्णय आहे, याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात झालेल्या सभागृहातील कलगी-तुऱ्यामुळे आगामी काळात इस्लामपूर मतदारसंघातील राजकारण वेगळ्या व निर्णायक वळणार जाण्याची शक्यता आहे.

जयंत पाटील यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीकडे आमदार जयंत पाटील यांनी पाठ फिरवली; पण इस्लामपूर मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती दाखवली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी कोणालाही प्रतिक्रिया देऊ नका, शांत राहा, असा कानमंत्र देऊन अधिवेशनासाठी मुंबईला रवाना झाले.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारUday Samantउदय सामंत