शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
2
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
3
८व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का? DA ते TA पर्यंत, पाहा काय मिळणार फायदा
4
पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर; "माझं राजकीय करियर..."
5
CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले
6
हायव्होल्टेज ड्रामा! "हा माझ्या मामाचा मुलगा, ८ वर्षांपासून प्रेम..."; लग्नात नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री
7
बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI
8
Leopard: बिबट्यांच्या दहशतीवर उपाय; ‘नसबंदी’ करणार, गावात सायरन वाजणार!
9
खुशीनेच अभिषेकच्या कुटुंबाला दिला आयुष्यभराचा घाव; गर्लफ्रेंडचं टॉर्चर सहन न झाल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
10
'या' इस्लामिक देशात गरजणार भारताचं 'तेजस' लढाऊ विमान; 'ब्रह्मोस'सह घेतली धमाकेदार एन्ट्री
11
धावपट्टीवर उतरताच विमानाला लागली आग, व्हिडिओमध्ये पहा भीषण अपघात
12
विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर-1, ₹7 लाखपेक्षाही कमी आहे किंमत; मायलेज 34 km! बघा टॉप-10 कारची लिस्ट
13
Numerology: कोणत्या मूलांकाची पत्नी ठरते पतीसाठी भाग्यवान? लग्नानंतर होतो भाग्योदय
14
Thane: इतिहासाच्या पाऊलखुणा! ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात सापडले प्राचीन शिल्प!
15
'धनुषसाठीही करणार नाही?' मॅनेजरने केला कास्टिंग काऊचचा प्रयत्न; प्रसिद्ध अभिनेत्रीचा आरोप
16
एका महिन्यांत सोने ₹9,508 अन् चांदीच्या किमतीत ₹26,250 रुपयांची घसरण; पाहा आजचे भाव...
17
WPL 2026: मेगा लिलाव कुठे पार पडणार? किती स्लॉट भरले जाणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
18
छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार 
19
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
20
मोबाईल फोनशी छेडछाड करणं पडणार महागात; होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

शेट्टींची मानसिंगरावांशी जवळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:55 IST

< p >कोकरुड : एकेकाळी शिराळा तालुक्यात खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबर असलेल्या आमदार शिवाजीराव नाईक यांच्या कार्यकर्त्यांची जागा माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली असून, राजू शेट्टी यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मानसिंगराव नाईक गटाची जवळीक वाढविल्याचे दिसत आहे. शेट्टी व आमदार शिवाजीराव नाईक यांच्यातील दुरावा यानिमित्ताने स्पष्ट झाला आहे.पूर्वीचा ...

<p>कोकरुड : एकेकाळी शिराळा तालुक्यात खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबर असलेल्या आमदार शिवाजीराव नाईक यांच्या कार्यकर्त्यांची जागा माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली असून, राजू शेट्टी यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मानसिंगराव नाईक गटाची जवळीक वाढविल्याचे दिसत आहे. शेट्टी व आमदार शिवाजीराव नाईक यांच्यातील दुरावा यानिमित्ताने स्पष्ट झाला आहे.पूर्वीचा कराड लोकसभा मतदारसंघ रद्द होऊन शिराळा विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघास जोडल्यापासून आमदार शिवाजीराव नाईक यांनी खासदार राजू शेट्टी यांना प्रत्येक निवडणुकीत साथ दिली आहे. राजू शेट्टी खासदार होण्यापूर्वी आ. शिवाजीराव नाईक व खा. राजू शेट्टी यांनी विधानसभेत एकत्र काम केले होते. तेव्हापासून दोघात मैत्री आहे. राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्यापासून आमदार शिवाजीराव नाईक यांच्या कार्यकर्त्यांची त्यांना मोठी मदत होती.याची परतफेड म्हणून खा. राजू शेट्टी यांनी आ. शिवाजीराव नाईक यांनी सूचवलेल्या कामांना निधी मिळवून देण्याचे काम केले. त्यामुळे मध्यंतरी शिवाजीराव नाईक आमदार नसतानाही राजू शेट्टी यांच्या माध्यमातून विकासकामांना बळ मिळाले. त्यानंतरच्या निवडणुकीत खा. राजू शेट्टी यांना आ. शिवाजीराव नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात मोठे मताधिक्य दिले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार शिवाजीराव नाईक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी राजू शेट्टी यांची इच्छा होती, मात्र शिवाजीराव नाईक यांनी त्यास नकार देत भाजपकडून निवडणूक लढवून विजय मिळवला. सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांनी आमदारकी आणि मंत्रीपद मिळवले.दरम्यान, खासदार राजू शेट्टी आणि भाजप-शिवसेना युती सरकारचे न पटल्याने स्वाभिमानी पक्ष सत्तेतून बाहेर पडल्याने त्यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाला. खासदार राजू शेट्टी यांनी भाजपच्या राज्यातील आणि केंद्रातील फडणवीस सरकारपासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत भाजप नेत्यांवर अनेकवेळा टीका केली, मात्र आ. शिवाजीराव नाईक यांच्यावर कधीही टीका केली नव्हती. परंतु दीड महिन्यापूर्वी खा. राजू शेट्टी आणि आ. शिवाजीराव नाईक यांनी एकमेकांवर टीका केल्याने या दोघात दुरावा निर्माण झाला होता, तसेच खा. राजू शेट्टी यांनी आ. शिवाजीराव नाईक यांचे राजकीय विरोधक असलेल्या आ. जयंत पाटील आणि माजी आ. मानसिंगराव नाईक यांच्या उद्योग समूहाला भेट देत कारखान्याच्या कारभाराचे कौतुक केले. खासदारांच्या कार्यक्रमांना माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह समर्थक उपस्थित रहात आहेत.गावोगावी संपर्क वाढलाखा. राजू शेट्टी हे गावागावात संपर्क वाढवत आपल्या स्थानिक विकास निधीचे वाटप करीत आहेत. खासदारांच्या कार्यक्रमांना माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह समर्थक उपस्थित रहात आहेत. शेट्टीही लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याशी जवळीक वाढवण्याचे काम करत आहेत. आ. शिवाजीराव नाईक यांच्या समर्थकांची जागा माजी आ. मानसिंगराव नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.