शेट्टींनी केवळ आंदोलनच केले : कोरे
By Admin | Updated: July 7, 2014 00:46 IST2014-07-07T00:43:11+5:302014-07-07T00:46:34+5:30
खासदाराने उसाचे आंदोलन सोडले,

शेट्टींनी केवळ आंदोलनच केले : कोरे
येलूर : आमच्या परिसरातील खासदाराने उसाचे आंदोलन सोडले, तर विकासाच्या दृष्टीने काहीही काम केलेले नाही, असा टोला खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता आमदार विनय कोरे (सावकर) यांनी लगावला.
येलूर (ता. वाळवा) येथे खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांचा गावच्यावतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून आ. कोरे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते पी. आर. महाडिक, नानासाहेब महाडिक, राजाराम कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, बबन महाडिक, राहुल महाडिक, मीनाक्षीताई महाडिक, सम्राट महाडिक, स्वरुप महाडिक, छायाताई पाटील, विजयसिंह महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी धनंजय महाडिक यांची गावातील प्रमुख मार्गावरून ढोल, ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. बाजारपेठेमध्ये ग्रामस्थांच्यावतीने आमदार विनय कोरे यांच्याहस्ते मुन्ना महाडिक यांचा चांदीची तलवार,फेटा व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वारणा कारखान्याचे संचालक गोविंदराव जाधव, धनाजीराव पाटील, जे. टी. महाडिक, भास्करराव पाटील, भगवानराव जाधव, शिवाजीराव पाटील, राजन महाडिक, गोपाळराव जाधव, विनायक महाडिक, सरदार गायकवाड, यशवंतराव पाटील, रामचंद्र जाधव, दिनकरराव जाधव, प्रकाश माळी, शहाजी पाटील, वसंतराव जाधव, बाळासाहेब घेवदे, शैलेश पाटील, शिवाजीराव महाडिक, जयसिंग जाधव, सुकुमार शिणगारे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)