शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी घालविला, विनोद तावडे यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 18:15 IST

शिराळा येथे भाजपचा संवाद मेळावा

शिराळा : मराठा आरक्षणासाठी भाजपने प्रामाणिक प्रयत्न केले. काँग्रेस-राष्ट्रवादीने वर्षानुवर्ष सत्ता भोगली. परंतु, शरद पवार यांनी कधीही आरक्षणाबाबत शब्द काढला नाही. मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी मारला, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी केले. शिराळा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा आमदार कितीही नौटंकी करू देत, ही जागा भाजपलाच मिळेल आणि भाजपच जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.

शिराळा येथे बुधवारी झालेल्या भाजप पदाधिकारी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, भाजपा नेते सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, भाजपचे नेते सम्राट महाडिक, सी. बी. पाटील, संपतराव देशमुख, केदार नलावडे, जगन्नाथ माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.सत्यजित देशमुख म्हणाले, येथील आमदारांनी कारखान्याच्या सभेमध्ये केंद्र सरकारचे धोरण साखर कारखानदारीला पोषक नाही म्हणून टीका केली. पुन्हा केंद्र सरकारकडून एनसीडीसीच्या माध्यमातून कारखान्याला कर्ज घेण्यासाठी येतात. हा दुटप्पीपणा त्यांनी सोडावा. सम्राट महाडिक म्हणाले, शिराळ्यातील केंद्रप्रमुख मजबूत आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ भाजपला मिळावा. विद्यमान आमदारांनी दबावाचा वापर करून लोकांना त्रास देण्याचे काम केले आहे. राज्य सरकारकडून भरपूर निधी मिळवला आणि भाजपाच्याविरोधातच कटकारस्थान रचले आहे.

यावेळी हणमंत पाटील, के. डी. पाटील, डॉ. सचिन पाटील, रणजीतसिंह नाईक, अशोक पाटील, जयकर कदम, सम्राट शिंदे, तानाजी कुंभार, भीमराव पाटील, सर्जेराव पाटील, शेखर भोसले, विद्याताई पाटील आदी उपस्थित होते.

शिराळ्यात कुणी कितीही नौटंकी करू दे..शिराळा मतदारसंघाची सर्व पार्श्वभूमी मी जाणून घेतली आहे. येथील आमदारांचे सर्व उद्योग मला माहिती आहेत. कुणी कितीही नौटंकी करू दे, त्याचा काही परिणाम होणार नाही. विधानसभेला येथे कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही. मराठा आरक्षण हे निव्वळ शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यामुळे सर्वोच्च न्यायालयात फेटाळले गेले. याउलट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजपने मराठा आरक्षण दिले. उच्च न्यायालयात ते टिकवूनदेखील दाखवले, असे तावडे यांनी सांगितले.

शिवाजीराव देशमुख यांची आठवणशिवाजीराव देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना भिवंडीत दंगल झाली. या दंगलीवेळी त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन कायदा-सुव्यवस्था हाताळली होती. त्यांच्या कामाचे कौतुक माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले होते, अशी आठवण तावडे यांनी सांगितली.

टॅग्स :SangliसांगलीVinod Tawdeविनोद तावडेSharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षण