शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

शाहिनबागचे आंदोलक उद्या सांगलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 3:45 PM

दिल्लीतील शाहिनबागच्या धर्तीवर येथील स्टेशन चौकात गेले ३२ दिवस सुरू असलेल्या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीच्या आंदोलनातील चार प्रमुख नेते शनिवारी सांगलीत येत आहेत. सायंकाळी सहा वाजता ते आंदोलनस्थळी भेट देऊन एनआरसी व सीएएह्णविरोधातील भूमिका मांडणार असल्याचे संयोजन समितीने पत्रकार बैठकीत सांगितले.

ठळक मुद्देशाहिनबागचे आंदोलक उद्या सांगलीतवसंतदादा पुतळ्यासमोर गेल्या बत्तीस दिवसांपासून सुरू आहे आंदोलन

सांगलीदिल्लीतील शाहिनबागच्या धर्तीवर येथील स्टेशन चौकात गेले ३२ दिवस सुरू असलेल्या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीच्याआंदोलनातील चार प्रमुख नेते शनिवारी सांगलीत येत आहेत. सायंकाळी सहा वाजता ते आंदोलनस्थळी भेट देऊन एनआरसी व सीएएह्णविरोधातील भूमिका मांडणार असल्याचे संयोजन समितीने पत्रकार बैठकीत सांगितले.दिल्ली विद्यापीठाच्या स्वाती खन्ना, असोसिएशन आॅफ मुस्लिम इंटिलेक्च्युअल मुस्लिमचे टी. एम. जियाऊलहक, आॅल आसाम अल्पसंख्याक विद्यार्थी संघाच्या सचिव हसिना अहमद, जेएनयू विद्यापीठाच्या विद्यार्थी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या अमृता पाठक हे चौघे सांगलीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत.याबाबत संयोजन समितीचे अय्याज नायकवडी, उमर गवंडी, आयुब पटेल म्हणाले, एनआरसी, सीएएला देशभरातून विरोध होत आहे. दिल्लीतील शाहिनबाग हे या आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ सांगलीच्या स्टेशन चौकातील वसंतदादा पुतळ्यासमोर गेल्या बत्तीस दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनाला वसंतबाग असे नाव दिले आहे. हे आंदोलन मुस्लिम महिलांनी हातात घेतले असून, रोज हजारो महिला सायंकाळी येथे जमून सरकारचा निषेध करीत आहेत. सर्व धर्मनिरपेक्ष, पुरोगामी विचारसरणीचे कार्यकर्ते व सर्व समाजघटकांतून त्याला पाठिंबा मिळत आहे.राज्य व देशपातळीवरील ६४ नेत्यांनी प्रत्यक्ष आंदोलनाला भेट दिली आहे. आंदोलनाची दखल शाहिनबागनेही घेतली आहे. तेथे सांगलीतील आंदोलनाचे लाईव्ह प्रक्षेपणही दाखविण्यात आले. शाहिनबाग आंदोलनातील चौघेजण शनिवारी सांगलीत येऊन पाठबळ देणार आहेत.

आंदोलनाचा लढा नगरसेविका वहिदा नायकवडी, रईसा रंगरेज, हवा आपाजान, शुभांगी साळुंखे, जयश्री पाटील, रेहाना शेख, सुलताना बेगम, बतुल शेख, आसमा फकीर आदी महिलांनी आक्रमक बनविला आहे. या आंदोलनास जिल्ह्यातील अनेक पक्ष व संघटनांनीही पाठींबा दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.यावेळी शहानवाज फकीर, जाफर शेख, मुनीर मुल्ला, इरफान शिकलगार, दाऊद ताशीलदार, यासीनखान पठाण, साहील खाटिक, इरफान शेख, वसीम बलबंड, शोएब पन्हाळकर, आक्रमक शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकagitationआंदोलनSangliसांगलीdelhiदिल्ली