शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

Sangli: खाऊचे आमिष दाखवून सात वर्षीय मुलीवर बलात्कार, तिघे अल्पवयीन ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 16:32 IST

वेदना झाल्याने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला

जत : शाळा सुटल्यावर घराकडे जात असताना खाऊचे आमिष दाखवून सात वर्षीय बालिकेवर तिघा अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार जत तालुक्यातील एका गावात समाेर आला आहे. ही घटना गुरुवार दि. १४ राेजी सायंकाळी घडली. तीनही अल्पवयीन मुलांना शुक्रवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित बालिका गावापासून चार किलाेमीटर अंतरावर असलेल्या वस्तीवर राहते. ती दररोज चालत शाळेत जाते. जवळच्या वस्तीवर असलेली १२, १४ व १६ वर्षाची तीन मुलेही तिच्याच शाळेत शिकतात. सर्वजण नेहमी एकत्रच शाळेत जात-येत असत. गुरुवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर या तीन मुलांनी पीडित मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवत रस्त्याच्याकडेला असलेल्या ओहळीत नेले. तिच्यावर बलात्कार केला. रात्री वेदना झाल्याने तिने आईला आपल्याला त्रास हाेत असल्याचे सांगितले. त्यानंतर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती. संबंधित तीनही अल्पवयीन मुलांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तिघेही अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेण्याच्या तसेच बाल सुधारगृहात रवाना करण्याच्या हालचाली सुरू होत्या. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस