कुंडल, विजयनगर, तुपेवाडीसह सात गावे हागणदारीमुक्त जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST2021-08-18T04:32:38+5:302021-08-18T04:32:38+5:30
सांगली : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सात गावे हागणदारीमुक्त जाहीर करण्यात आली. विजयनगर (ता. मिरज), अमृतवाडी (ता. जत), पानमळेवाडी (ता. ...

कुंडल, विजयनगर, तुपेवाडीसह सात गावे हागणदारीमुक्त जाहीर
सांगली : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सात गावे हागणदारीमुक्त जाहीर करण्यात आली. विजयनगर (ता. मिरज), अमृतवाडी (ता. जत), पानमळेवाडी (ता. तासगाव), तुपेवाडी (ता. कडेगाव), ढोलेवाडी (ता. शिराळा), यपाचीवाडी (ता. आटपाडी) आणि कुंडल (ता. पलूस) अशी गावे आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती दिली.
या गावांनी निरंतर स्वच्छतेसाठी केलेली कामे लक्षात घेऊन निवड करण्यात आली. येत्या वर्षभरात उर्वरित ११७ गावे हागणदारीमुक्त केली जाणार आहेत. स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन अंतर्गत गावातील कुटुंबे, शाळा, ग्रामपंचायत आदी ठिकाणी शौचालये असल्याची पाहणी झाली. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, अभ्यागत व स्थलांतरितांसाठी शौचालये, स्वच्छतेसाठी प्रचार आदींचीही दखल घेण्यात आली.