Sangli: मधमाश्यांच्या हल्ल्यात सात जण जखमी, तीन लहान मुलांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 17:11 IST2024-06-25T17:11:33+5:302024-06-25T17:11:54+5:30
शिरसी (जि. सांगली ) : कोंडाईवाडी (ता. शिराळा) येथे साेमवारी नायकुडा शिवारात शेतीचे काम करत असताना अचानक मधमाश्यांनी केलेल्या ...

Sangli: मधमाश्यांच्या हल्ल्यात सात जण जखमी, तीन लहान मुलांचा समावेश
शिरसी (जि. सांगली) : कोंडाईवाडी (ता. शिराळा) येथे साेमवारी नायकुडा शिवारात शेतीचे काम करत असताना अचानक मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये तीन लहान मुलांसह सात लोक जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना कराड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कोंडाईवाडी येथील नायकुडा शिवारात सावंत कुटुंबीय आपल्या शेतामध्ये, सध्या पावसाची उघडीप मिळाल्यामुळे भात पिकाची कोळपण करत होते. घरातील लहान मुलेही त्यांच्यासोबत होती. दुपारी बाराच्या दरम्यान शेतातील काम संपत आले असताना अचानक काम करत असलेल्या लोकांसह असणाऱ्या दोन लहान मुलांवर मधमाश्यांनी हल्ला केला.
मधमाशीने चावा घेतल्याने मुलांना असह्य वेदना होऊन उलट्या होऊ लागल्या. यावेळी शेजारील शेतात काम करत असलेल्या लोकांना संपर्क साधून खासगी वाहनाने जखमींना कराड येथील शासकीय रुग्णालयात पाठवले.