शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगली येथील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आंदोलक घुसले कसे?; जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 18:33 IST

दोषींवर कारवाईचे संकेत

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली दौऱ्यावेळी काही आंदोलकांनी निषेधाचे फलक हाती घेत घोषणाबाजी केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस व जिल्हा प्रशासनाला धारेवर धरण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आंदोलक घुसले कसे? असा जाब वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विचारण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस प्रशासनानेही दोषींवर कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.मनसे व सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्ह्यात भयमुक्त, नशामुक्त अभियान सुरू आहे. काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी वेळ मागितली होती. पण जिल्हा प्रशासन व पोलिसांनी त्यांना भेट नाकारली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात बाधा नको म्हणून नशामुक्त अभियानाचे निमंत्रक तानाजी सावंत, सतीश साखळकर, शंभुराज काटकर, उमेश देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते.

दरम्यान, दुपारी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कवलापूर विमानतळावर आले. तेथून त्याचा ताफा संजयनगरच्या दिशेने रवाना झाला. यावेळी संजयनगर हद्दीत काही आंदोलकांनी फलक हाती घेत जोरदार घोषणाबाजी केली. त्याचे व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाले. काही जणांनी कार्यक्रमस्थळी सुरक्षा यंत्रणा भेदून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आंदोलकांनी निषेध घोषणा दिल्याने जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेवर हलगर्जीपणा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून अहवाल मागविल्याचेही समजते आहे. सांगलीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी, अंमलदारांची बैठक घेतल्याचेही समजते. लवकरच दोषींवर कारवाईचे संकेत मिळतात. आता संबंधितांवर कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Security Lapse: Protesters Disrupt Maharashtra CM's Sangli Visit, Officials Scrutinized

Web Summary : Protesters breached security during Maharashtra CM Fadnavis's Sangli visit, raising questions about administrative oversight. Despite preventive detentions, demonstrators staged protests, prompting scrutiny of police and district officials. An inquiry is underway to determine accountability for the security lapse during the visit.