सत्तेसाठी भाजप नेत्यांचे स्वार्थी राजकारण; जनतेकडूनच खिल्ली : पृथ्वीराज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 07:29 PM2020-05-22T19:29:23+5:302020-05-22T19:32:36+5:30

मोठ्या प्रमाणात गर्दी असणाऱ्या मुंबईतही तात्काळ उपाययोजना सुरू केल्या. कोणत्याही राज्यात झाल्या नाहीत इतक्या गतीने मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्ट केल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहमंत्री, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सर्व मंत्री व आमदार खासदार पदाधिकारी जनतेत उतरून काम करीत आहेत.

Selfish politics of BJP leaders for power | सत्तेसाठी भाजप नेत्यांचे स्वार्थी राजकारण; जनतेकडूनच खिल्ली : पृथ्वीराज पाटील

सत्तेसाठी भाजप नेत्यांचे स्वार्थी राजकारण; जनतेकडूनच खिल्ली : पृथ्वीराज पाटील

Next
ठळक मुद्देजनतेने फिरवली पाठ - भाजपच्या आंदोलनाची जनतेकडूनच खिल्ली

सांगली : कोरोनाच्या महाभयंकर संकटातही केवळ स्वार्थी राजकारण करीत आंदोलनाचे आवाहन करीत महाराष्ट्राबद्दल उसनं प्रेम दाखवत आंदोलनाचे नाटक करणारी भाजप उघडी पडली असून सामान्य जनता महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारबरोबर असल्याचे स्पष्ट झाले आहे. सामान्य जनतेने भाजपच्या आंदोलनाकडे पूर्णपणे पाठ फिरवली असून सोशल मिडियावर तर या आंदोलनाची जोरदार खिल्ली उडवण्यात आली आहे, असा टोला काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना लगावला. 

 

ते म्हणाले की, भाजप नेते हे सत्तेविना तडफडत आहेत. वास्तविक कोरोनाबाबत सर्वाधिक गतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकीया राबवली आहे. कोरोनाचे गांभीर्य ओळखून पंतप्रधानांनी जाहीर करण्यापूर्वीच लाॅकडाऊनचा मार्ग स्विकारला आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी असणाऱ्या मुंबईतही तात्काळ उपाययोजना सुरू केल्या. कोणत्याही राज्यात झाल्या नाहीत इतक्या गतीने मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्ट केल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहमंत्री, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सर्व मंत्री व आमदार खासदार पदाधिकारी जनतेत उतरून काम करीत आहेत. केवळ कामाचे प्रदर्शन न करता परिणामाकारक काम केले जात आहे. जनताही त्यावर समाधानी आहे. वास्तविक या संकटाने सारं जग अडचणीत आले आहे, अशावेळी महाराष्ट्रही त्याला बळी पडत आहे. मात्र महाआघाडी सरकार व प्रशासनाच्या अचूक नियोजन व कामामुळे बरीच हानी टाळता आली आहे.

इतक्या मोठ्या संकटात सरकार विरोधात कांगावा करीत बसण्यापेक्षा सरकारसोबत चर्चा करून प्रश्न कसे सोडवता येतील, काय करावे लागेल यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. मात्र भाजपला ते करायचेच नाही. प्रश्न अधिक कसे तयार होतील व आपल्याला त्यावर राजकीय पोळी कशी भाजता येईल याचाच प्रयत्न भाजप करीत आहे.

भाजपच्या या राजकीय खेळीला जनतेने ओळखले आहे. त्यामुळेच मोजके कार्यकर्ते व पदाधिकारी वगळता सामान्य जनतेने याकडे पाहिलेसुद्धा नाही. सोशल मिडियावरही या भाजप आंदोलनास खडे बोल सुनावले आहेत. एकुणच जनतेनेच हे आंदोलन बेदखल केले आहे.

Web Title: Selfish politics of BJP leaders for power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.