जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर पेरणीच नाही!
By Admin | Updated: July 24, 2014 23:13 IST2014-07-24T23:01:12+5:302014-07-24T23:13:45+5:30
जिल्ह्यात केवळ ४४ टक्केच पेरण्या : उत्पन्नात २५ टक्के घटीची कृषी अधिकाऱ्यांची शक्यता; शेतकऱ्यांची रब्बीची तयारी

जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर पेरणीच नाही!
सांगली : जिल्ह्यात वेळेवर मान्सून दाखल न झाल्यामुळे आणि सध्याही दुष्काळी भागात पावसाचा जोर नसल्यामुळे दोन लाख १९ हजार ५८४ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्याच झालेल्या नाहीत़ त्यामुळे जिल्ह्याच्या सरासरी उत्पन्नात ६० टक्के, तर खरीप पिकांच्या उत्पन्नात २० ते २५ टक्के घट येण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे़
खरीप पेरणीसाठी १५ जून ते १५ जुलै हा कालावधी योग्य आहे़ पण, पूर्ण जून महिन्यात पाऊसच झाला नाही़ जुलैत पावसाने हजेरी लावली़ परंतु, रिमझिम पाऊस झाल्यामुळे खरीप पिके जगवण्यापुरताच त्याचा उपयोग झाला आहे़ जिल्ह्यात खरीप पेरणीचे तीन लाख ९२ हजार ५१० हेक्टर क्षेत्र आहे़ यापैकी एक लाख ७२ हजार ९२६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे़ त्याची टक्केवारी केवळ ४४ टक्के आहे़ या पेरण्याही उशिरा झाल्यामुळे येथील उत्पन्नात २० ते २५ टक्केपर्यंत घट येण्याची शक्यता आहे़ पेरणी न झालेले क्षेत्र सर्वाधिक म्हणजे ५६ टक्के आहे़ सध्या पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात जास्तीत-जास्त ८० टक्के खरीप पेरण्या होण्याची शक्यता आहे़ उर्वरित एक लाख हेक्टर क्षेत्र नापेरच राहण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे़ जिल्ह्याच्या सरासरी उत्पन्नावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे़ काही शेतकऱ्यांनी तर खरीप पेरण्यांऐवजी रब्बी पेरणीसाठीच प्रयत्न सुरू केले आहेत़ एक हंगाम वाया जाणार असल्याने शेतकऱ्यांनी रब्बीचा निर्णय घेतला आहे़ (प्रतिनिधी)
कृषी दुकानदारही अडचणीत
कृषी सेवा केंद्रचालकांनी बियाणांचा मुबलक साठा करून ठेवला होता़ बाजरी, ज्वारी, मटकी, मूग आदी बियाणांचाही दुकानदारांनी साठा करून ठेवला होता़ परंतु, पाऊस नसल्यामुळे खरीप पेरण्याच झाल्या नसल्याने दुकानात बियाणे तसेच पडून राहिले आहे़ दुकानदार शिवाजी पाटील यांनी सांगितले की, आमचे छोटे दुकान असल्यामुळे पन्नास हजारांचा तोटा झाला आहे़ मोठ्या दुकानदारांचे भांडवल अडकून पडल्यामुळे त्यांचा सर्वाधिक तोटा झाला आहे़

तालुकापेरणी क्षेत्र पेरणी
मिरज५९०१८८८१४
जत४५७८०३५८९८
खानापूर४९०५४२२३९३
वाळवा५७१६०२५३२४
तासगाव४५०३७१४७७४
शिराळा३५५८५२१३६५
आटपाडी१७५४४७९०१
क़ महांकाळ२५८४२१३१५९
पलूस२३९०९२२२५
कडेगाव३३५८१२१०७३
एकूण३९२५१०१७२९२६