सांगलीतील पूरग्रस्तांना सातारा, पुणेकरांचा मदतीचा हात -: पूरग्रस्तांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:26 PM2019-08-13T23:26:47+5:302019-08-13T23:29:37+5:30

शंभुराजे ग्रुप साखराळे, देवराज दादा पाटील ग्रुप कासेगाव, आर्या बेकरी, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यासह असंख्य दानशूर व्यक्ती व संस्थांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हातभार लावला आहे.

Satara, Punekar's helping hand to flood victims in Sangli | सांगलीतील पूरग्रस्तांना सातारा, पुणेकरांचा मदतीचा हात -: पूरग्रस्तांना आधार

फार्णेवाडी (ता. वाळवा) येथील पूरग्रस्त कुटुंबांना कºहाड येथील गजानन हौसिंग सोसायटी व अष्टविनायक गणेश मंडळातर्फे मदत देण्यात आली.

Next
ठळक मुद्देअनेक सामाजिक संस्थांचा पुढाकार; पक्ष, संघटना, महाविद्यालयीन तरुणही धावले महापूरग्रस्तांच्या मदतीला

जितेंद्र येवले ।
इस्लामपूर : महापूर ओसरला आणि शेजारील सातारा, पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मदतीचा महापूर सुरू झाला आहे. येथील उद्योजक सर्जेराव यादव यांनी बहे, बोरगाव, शिरटे, नरसिंहपूर यासह इतर गावांतील पूरग्रस्तांची औद्योगिक वसाहतीमधील मल्टिपर्पज हॉलमध्ये जेवण, राहणे, तसेच औषधोपचाराची सोय केली. शंभुराजे ग्रुप साखराळे, देवराज दादा पाटील ग्रुप कासेगाव, आर्या बेकरी, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यासह असंख्य दानशूर व्यक्ती व संस्थांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हातभार लावला आहे.

कºहाड येथील गजानन हौसिंग सोसायटी व गोवारे येथील अष्टविनायक गणेश मंडळ, तसेच चौंडेश्वरीनगरच्या सभासदांनी गहू, ज्वारी, साखर, पाणी, खाद्यपदार्थांचे दोन ट्रक भरुन आणले होते. पूरग्रस्त भागातील बोरगाव, बनेवाडी, गौंडवाडी, जानुगडेवाडी, फार्णेवाडी, बहे, शिरटे, पाटील मळ्यामध्ये घरोघरी जाऊन त्याचे ग्रामस्थांना वाटप केले.

पंधरा हजार चपात्या, चटणीचे वाटप
पिंपरी चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने व मित्र परिवाराने शिरटे येथे १५ हजार चपात्या, चटणी व धान्य, शुद्ध पाणी दिले. शेवाळेवाडीचे (पुणे) माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांचे पुत्र राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा सरचिटणीस विक्रम शेवाळे, राजेंद्र शेवाळे आनंद स्मृती मंडळ, नवचैतन्य मंडळ, राजे क्लब व समस्त गावकरी व सार्वजनिक मंडळ, शेवाळेवाडी यांनी एक ट्रक धान्य, किराणा माल, कपडे, ब्लँकेट आदी साहित्य आणून पूरग्रस्त भागात वितरित केले.

दुचाकींची विनामोबदला दुरुस्ती
इस्लामपूर येथील दुचाकी दुरुस्त करणारे मिस्त्री सुधाकर पाटील (रा. साखराळे) यांनी या महापुराच्या कालावधित पाणी जाऊन बंद पडलेल्या ४७ दुचाकी विनामोबादला दुरुस्त करुन दिल्या आहेत. इस्लामपूर येथे पाटील यांचे निळकंठ होस्टेलसमोर दुचाकी दुरुस्त करण्याचे गॅरेज आहे. त्यांनी बनेवाडी, साटपेवाडीसह रस्त्यावर बंद पडलेल्या दुचाकी विनामोबादला दुरुस्त करुन दिल्या.

आबुधाबी ते शिरटे मदत
आबुधाबी येथील एअर फोर्समध्ये कार्यरत असलेले जवान सुरेश पाटील यांनी पत्नी मीनाली पाटील यांच्याकडून शिरटे येथील पूरग्रस्तांसाठी ब्लँकेट, खाद्यपदार्थ व इतर साहित्य पाठवून दिले.

 

शालेय साहित्य विक्रेता संघटना इस्लामपूरच्यावतीने वाळवा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील बहे, नवे— जुनेखेड, बोरगाव व इतर गावांतील ५00 विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीटचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये सॅक, वह्या व इतर साहित्याचा समावेश करण्यात आला आहे.
- मोहन पाटील, राज्य संघटक, विक्रेता संघटना.
 

Web Title: Satara, Punekar's helping hand to flood victims in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.