शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

मिरजेतील सतार, तानपुऱ्याची तार जीआय मानांकनाने छेडली; केंद्र शासनाकडून सन्मानामुळे लौकिकामध्ये भर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 5:43 PM

परदेशी कलाकारांकडून कलेला दाद

मिरज : मिरजेतील सतार व तानपुरा या तंतुवाद्यांना केंद्र शासनाकडून जीआय (भौगोलिक ओळख) मानांकन मिळाले आहे. सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरजेतील तांतुवाद्यांना प्रथमच भौगोलिक ओळख मिळाली आहे. यामुळे या संगीत वाद्यांना पारंपरिकता व विशिष्ट गुणवत्ता लाभली आहे.

तांतुवाद्यांना जीआय मानांकन मिळाल्याने मिरजेतील तंतुवाद्यांची इतरांना नक्कल करता येणार नाही. इतर ठिकाणची वाद्ये मिरजेच्या नावाने विक्री करता येणार नाहीत. यामुळे मिरजेतील तंतुवाद्यांना देशात व परदेशात निर्यातीसाठी फायदा होऊन तंतुवाद्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ओळख मिळाल्याचे ज्येष्ठ तंतुवाद्य निर्माते बाळासाहेब मिरजकर यांनी सांगितले.मिरज म्युझिकल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर तसेच मिरज सितार व सोलटुन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर या संस्थांच्या मिरज तानपुरा वाद्यांना जीआय मानांकन मिळाले आहे. जीआय मानांकन मिळवण्यासाठी नाबार्ड, हस्तकला विभाग कोल्हापूर, उद्योग विभाग सांगली यांचे सहकार्य लाभले. जीआय तज्ज्ञ डॉ. रजनीकांत यांच्या संस्थेच्या माध्यमातून जीआय मानांकनासाठी अर्ज दाखल केला होता. या प्रस्तावाची पडताळणी होऊन मिरजेत निर्मिती होणाऱ्या या तंतुवाद्यांना ३० मार्च रोजी जीआय मानांकनाची नोंदणी मिळाली.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारांना वाद्यपुरवठामिरज शहर हे तंतुवाद्यांचे माहेरघर आहे. मिरजेतील तंतुवाद्यांची निर्मिती जगभर प्रसिद्ध असून तंतुवाद्य निर्मात्यांच्या अनेक पिढ्या येथे अद्याप या व्यवसायात कार्यरत आहेत. शेकडो कुटुंबे या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करत असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारांना मिरजेतून तंतुवाद्ये निर्माण करून देणाऱ्या कारागिरांनी मिरजेचा नावलौकिक सातत्याने वाढविला आहे. यावेळी मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे अध्यक्ष मोहसीन मिरजकर, सोलट्युन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कंपनीचे अध्यक्ष मुबीन मिरजकर, संचालक अल्ताफ पिरजादे, बाळासाहेब मिरजकर, फारुक सतरमेकर, नासीर मुल्ला, रियाज सतारमेकर उपस्थित होते.

परदेशी कलाकारांकडून कलेला दाददर्जेदार, नावीन्यपूर्ण वाद्ये तयार करून मिरजेतून परदेशात पाठविण्यात येतात. अनेक परदेशी कलाकार खास तंतुवाद्य निर्मिती पाहण्यासाठी दरवर्षी मिरजेला भेट देत असतात. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मिरजेच्या या व्यवसायाबद्दल कलाकारांत आकर्षण आहे.

तंतुवाद्य निर्माते, कारागिरांना तसेच व्यवसायाला वैभव प्राप्त करून देण्यासाठी जीआय मानांकनामुळे हातभार लागणार आहे. यापुढील काळात मिरजेतील इतर वाद्यांनाही जी.आय. मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मानांकनामुळे मिरजकर म्हणून आम्हाला मोठा आनंद झाला आहे. - बाळासाहेब मिरजकर, ज्येष्ठ तंतुवाद्य निर्माते, मिरज

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरज