संजनगरचा पोलीस हवालदार लाचलुचपतच्या जाळ्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 16:43 IST2020-06-15T16:42:27+5:302020-06-15T16:43:13+5:30
दोन हजारांची लाच स्विकारताना संजयनगर पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार संतोष फडतरे यास रंगेहाथ पकडण्यात आले. रविवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

संजनगरचा पोलीस हवालदार लाचलुचपतच्या जाळ्यात!
सांगली : दोन हजारांची लाच स्विकारताना संजयनगर पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार संतोष फडतरे यास रंगेहाथ पकडण्यात आले. रविवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
एकावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी फडतरे याने लाचेची मागणी केली होती. रविवारी सकाळी दोन हजारांची लाच स्विकारताना त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
दोनच दिवसापूर्वी व्यापाऱ्याला धमकावून त्याच्याकडूून पैसे वसूल करणाऱ्या पोलिसाला पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी निलंबीत केले होते. आत रविवारी याच पोलीस ठाण्याकडील पोलिसाला लाच घेताना पकडण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.