शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळच्या ठिणगीने उडणार तासगावात भडका, संजयकाका पाटील-रोहित पाटील गटात संघर्ष वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 16:11 IST

कवठेमहांकाळ नगराध्यक्ष निवडणुकीचे उट्टे काढण्यासाठी रोहित पाटील यांनी तासगाववर लक्ष केंद्रित केले आहे.

दत्ता पाटीलतासगाव : कवठेमहांकाळ तालुक्यातील नगराध्यक्ष निवडीच्या निमित्ताने खासदार आणि आमदार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. या निवडीत दोन्ही गटांत संघर्षाची ठिणगी उडाली आहे. या ठिणगीचा तासगाव तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भडका उडणार आहे. त्यामुळे आबा-काका गटातील संघर्ष मूळ वळणावर येणार असल्याचे चित्र आहे.कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी एकहाती सत्ता आणली. मात्र, खासदार संजयकाका पाटील यांनी नगराध्यक्ष बदलावेळी ‘काका स्टाईल’ने सत्तांतर घडवून भाजपचा नगराध्यक्ष करून दाखविला. यानिमित्ताने तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या पश्चात, आमदार-खासदार गटात सुरू असलेल्या ‘अंडरस्टँडिंग’च्या राजकारणाला ब्रेक मिळाल्याचे स्पष्ट झाले.तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात विशेषत: तासगाव तालुक्यात आबा गटाविरुद्ध काका गट असा पारंपरिक टोकाचा संघर्ष तालुक्याने अनेक वर्ष अनुभवला होता. मात्र, आबांच्या पश्चात या संघर्षाला पूर्णविराम मिळाला. आमदारही आपला आणि खासदारही आपला, या पॅटर्नने तासगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जुळवून घेतले होते. मात्र, या तडजोडीला कवठेमहांकाळ नगरपंचायतीतील नगराध्यक्ष निवडीने ब्रेक लागला आहे.

ती निवड ज्या पद्धतीने झाली, त्यावरून आबा-काका गटातील आणि दोन्ही गटांच्या नेत्यांतील संघर्ष मूळ वळणावर आल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडीनंतर दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप, सोशल मीडियावर रंगले आहेत. तालुक्यावर कोणाचे वर्चस्व राहणार हे आगामी निवडणुकांतून स्पष्ट होणार आहे.

रोहित पाटील उट्टे काढणार का?येत्या काही दिवसांत तासगाव तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, तासगाव बाजार समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. कवठेमहांकाळ नगराध्यक्ष निवड रोहित पाटलांसाठी धक्कादायक, तर खासदार संजयकाकांसाठी वर्चस्व सिद्ध करणारी ठरली. त्यामुळे तासगाव तालुक्यात होणाऱ्या निवडणुकीत वर्चस्व कायम राखण्यासाठी खासदार पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे, तर कवठेमहांकाळचे उट्टे काढण्यासाठी रोहित पाटील यांनी तासगाववर लक्ष केंद्रित केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाRohit Patilरोहित पाटिल