शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:47 IST

Sangli Blast news: गॅस गळती किंवा रेफ्रिजरेटरमधील दूषित गॅसमुळे दुर्घटना घडल्याची प्राथमिक शक्यता; घटनेनंतर विटा शहरात हळहळ व्यक्त.

- दिलीप मोहितेविटा (जि. सांगली) : येथील एका भांडी व फर्निचर दुकानाला अचानक लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. यात दोन महिलांसह एक पुरूष व एका दोन वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे. विष्णू पांडूरंग जोशी (वय ५०), त्यांची पत्नी सुनंदा जोशी (वय ४५), त्यांची विवाहित मुलगी प्रियांका इंगळे (वय २८) व नात सृष्टी इंगळे (वय ३, सर्व रा. सावरकरनगर, विटा) अशी या दुर्घटनेत ठार झालेल्या चौघांची नावे आहेत. सुदैवाने विष्णू यांची दोन मुले मनीष (वय २५) व सूरज (वय २२) हे प्रसंगावधान राखून गॅलरीतून बाहेर पडल्याने बचावले. ही  घटना सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास विटा येथे घडली.

विटा येथील सावरकरनगरमध्ये विष्णू जोशी यांचे जय हनुमान स्टील सेंटर हे भांडी व फर्निचरचे मोठे दुकान आहे. या दुकानात खालील भागात भांडी, पहिल्या मजल्यावर लाकडी फर्निचर, गादीचे साहित्य व त्यावरील मजल्यावर जोशी कुटुंब राहण्यास आहे. या दुकानात आतील बाजूस जीना असून या जीन्यातून हे कुटुंब वरील दोन्ही मजल्यावर ये-जा करत होते.

सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दुकानाच्या आतील बाजूस अचानक आग लागली. त्यावेळी दुकानाचे दोन्ही शटर आतून बंद होते. तर जोशी कुटुंबातील सहा सदस्य वरील मजल्यावर होते. ही आग झपाट्याने पसरली. त्यावेळी रस्त्याने ये-जा करणाºया लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर लोक जमा झाले. परंतु, भांड्याच्या दुकानात आग लागल्याने जोशी कुटुंबातील लोकांना जीन्यावरून बाहेर पडता आले नाही.

तरीही तरूणांनी शेजारच्या इमारतीच्या टेरेसवरून आतील गॅलरीमधून मनीष (वय २५) व सूरज (वय २२) या दोन भावांना बाहेर घेतले. मात्र, विष्णू, त्यांची पत्नी सुनंदा, मुलगी प्रियांका इंगळे व तीन वर्षाची सृष्टी इंगळे यांना बाहेर पडता आले नाही. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण करून इमारतीच्या दुसºया मजल्यावर प्रवेश केला होता.

तरूणांनी भिंतीला भगदाड पाडून आतून लोकांना बाहेर घेण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आगीत विष्णू, सुनंदा, प्रियांका व सृष्टी या चिमुकलीचा होरपळून जागीच मृत्यू  झाला. या घटनेनंतर विटा, कडेगाव, पलूस, तासगाव, कुंडल येथील अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. चार ते पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. शेकडो तरूणांचे हात मदतीसाठी सरसावले होते. आ. सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी स्वत: घयनास्थळी थांबून घरात अडकलेल्या जोशी कुटुंबियाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

स्थानिक नागरीक, तरूण आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या परिश्रमातून ही आग आटोक्यात आली.या घटनेने विटा शहर हादरले असून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. खा. विशाल पाटील, पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेची माहिती घेतली. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Vita, Sangli Shaken: Refrigerator, Cylinder Blast Kills Family of Four

Web Summary : A tragic refrigerator and cylinder explosion in Vita, Sangli, killed four family members. Gas leak or faulty refrigerator gas likely caused the devastating blast, raising safety concerns about home appliances.
टॅग्स :SangliसांगलीBlastस्फोट