शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत घरफोडी; दागिने, रोकड लंपास, उन्हाळी सुटी : बंद घरे टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 16:59 IST

उन्हाळी सुटीला कुटुंब परगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी शहरातील बंद घरे टार्गेट केली आहेत. कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळ राजाराम दत्तू पाटील यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा ४८ हजारांचा माल लंपास केला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद आहे.

ठळक मुद्देसांगलीत घरफोडी; दागिने, रोकड लंपासउन्हाळी सुटी : बंद घरे टार्गेट४८ हजारांचा माल लंपास

सांगली : उन्हाळी सुटीला कुटुंब परगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी शहरातील बंद घरे टार्गेट केली आहेत. कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळ राजाराम दत्तू पाटील यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा ४८ हजारांचा माल लंपास केला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद आहे.पाटील कुटुंबीय आकाशवाणी केंद्रामागे नवीन पाण्याच्या टाकीजवळ राहतात. ११ मे रोजी हे कुटुंब उन्हाळी सुटी असल्याने परगावी गेले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचा कडी व कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील साहित्य विस्कटले. लॉकरमधील २८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व वीस हजारांची रोकड असा ४८ हजारांचा ऐवज लंपास केला.

पाटील कुटुंब सोमवारी रात्री परगावाहून परतले, त्यावेळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी रात्री उशिरा पाटील यांची फिर्याद घेऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हेगारांनी घर बंद असल्याची खात्री करुनच चोरी केल्याचा संशय आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrimeगुन्हाPoliceपोलिस