Shriramapura burglary; 75 thousand goods lump | श्रीरामपुरात घरफोडी; ७५ हजारांचा माल लंपास
श्रीरामपुरात घरफोडी; ७५ हजारांचा माल लंपास

श्रीरामपूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील मध्यवस्तीत अ‍ॅड. शशिकांत गांधी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. ४ मार्च रोजी मध्यरात्री ही घटना घडल्याचा पोलिसांचा संशय आहे.
अ‍ॅड. शशिकांत गांधी कुटुंबियांसमवेत बाहेरगावी गेले होते. त्यांचे शेजारी वैशाली कुलकर्णी यांनी गांधी यांच्या घराचे दरवाजे उघडे असलेले पाहिले. त्यांनी लगेचच घटनेची माहिती गांधी यांना दिली. बाहेरगावावरुन आल्यानंतर आज, मंगळवारी गांधी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे व गुन्हा अन्वेशन पथकाने घराची पाहणी केली. एलईडी टिव्ही, रिमोट, कॅमेरा, घड्याळ, चांदीची साखळी व पैंजण, सोन्याचे अन्य दागिने व काही रोख रकम असा सुमारे ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


Web Title: Shriramapura burglary; 75 thousand goods lump
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.