Sangli ZP Election Results 2026: खानापूर, आटपाडी तालुक्यात शिंदेसेनेची जोरदार मुसंडी

By अशोक डोंबाळे | Updated: February 9, 2026 11:55 IST2026-02-09T11:54:01+5:302026-02-09T11:55:26+5:30

नेलकरंजी पंचायत समिती गणातून सुनीता सरगर तर खरसुंडी पंचायत समिती मीनाक्षी पुजारी विजयी

Sangli ZP Election Results 2026 Shinde Sena candidates are leading in Khanapur, Atpadi taluka | Sangli ZP Election Results 2026: खानापूर, आटपाडी तालुक्यात शिंदेसेनेची जोरदार मुसंडी

Sangli ZP Election Results 2026: खानापूर, आटपाडी तालुक्यात शिंदेसेनेची जोरदार मुसंडी

सांगली: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिंदेसेनेने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. सहा फेऱ्यांचा निकाल हाती आला असून खानापूर तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणात शिंदेसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत.

आटपाडी तालुक्यातही दिघंची आणि खरसुंडी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात शिंदेसेनेचेच उमेदवार आघाडीवर आहेत. खरसुंडी गट आणि गणातील उमेदवार विजय झाले आहेत.

जिल्हा परिषद नागेवाडी गटातून - शीतल बाबर दोन हजार ४६ मतांनी आघाडीवर आहेत. लेंगरे गट - मनीषा बागल २३५ मतांनी आघाडीवर तर करंजे गट - सई शिंदे ४७ मतांनी आघाडीवर, भाळवणी गट - हिम्मतराव जाधव ५४९ मतांनी आघाडीवर आहेत.

खानापूर तालुक्यात चारही गटात शिंदे सेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत. आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गटातून शिंदेसेनेचे जयदीप भोसले विजय झाले आहेत. नेलकरंजी पंचायत समिती गणातून सुनीता सरगर तर खरसुंडी पंचायत समिती मीनाक्षी पुजारी विजयी झाल्या आहेत.

Web Title : सांगली ZP चुनाव 2026: खानापुर, आटपाडी में शिंदे सेना का दबदबा

Web Summary : सांगली ZP चुनावों में शिंदे सेना आगे, खानापुर और आटपाडी में बढ़त। खरसुंडी ZP समूह और नेलकरंजी पंचायत समिति में उम्मीदवारों की जीत। शीतल बाबर 2046 वोटों से नागेवाड़ी में आगे।

Web Title : Shinde Sena Dominates Sangli ZP Elections 2026 in Khanapur, Atpadi

Web Summary : Shinde Sena surges ahead in Sangli ZP elections, leading in Khanapur and Atpadi. Candidates secure victories in Kharsundi ZP group and Nelkaranji Panchayat Samiti. Sheetal Babar leads in Nagewadi with 2046 votes.