शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election: सांगली जिल्हा परिषद मतदारसंख्येत १० व्या स्थानी, सरासरी २९ हजार ८१५ मतदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 15:42 IST

पुरुष मतदार अधिक, सर्वाधिक मतदार कुठं.. वाचा 

सांगली : सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एका गटासाठी सरासरी २९ हजार ८१५ मतदारसंख्या असेल. निवडणूक प्रशासनाने जिल्हा परिषदेचे ६१ गट आणि पंचायत समित्यांच्या १२२ गणांची मतदारसंख्या निश्चित केली आहे.नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होतील. ३ डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होईल. या पार्श्वभूमीवर मतदारयाद्या अंतिम करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. नव्या प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषदेचे ६१ गट आणि पंचायत समित्यांच्या १२२ गणांसाठी निवडणुका होणार आहेत. त्यांचे आरक्षणही नुकतेच निश्चित झाले आहे. गट आणि पंचायत समितीच्या गणांची अंतिम रचनाही झाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षणही जाहीर झाले आहे. एकूण ६१ गटांपैकी ३१ गट महिलांसाठी राखीव आहेत. आता फक्त निवडणुकीची घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे.सर्वाधिक म्हणजे मिरज तालुक्यात ११, वाळवा तालुक्यात ११ आणि जत तालुक्यात ९ गट आहेत. खानापूर, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव, शिराळा व आटपाडीत प्रत्येकी ४ गट आहेत. तासगावमध्ये ६ गट आहेत. त्यामुळे सर्वाधिक गट असणारे मिरज, वाळवा आणि जत हे तीन तालुके जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्याच्या दृष्टीने किंगमेकर ठरू शकतात. जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या आहे. निवडणूक आयोगाकडील माहितीनुसार, एका गटासाठी सरासरी २९ हजार ८१५ मतदार राहणार आहेत.राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मुदत संपून पावणेचार वर्षे होऊन गेली आहेत. सध्या या संस्थांवर प्रशासकीय राजवट आहे. आता तब्बल पावणेनऊ वर्षांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचीही निवडणूक होत आहे. यासाठी जिल्हा गट आणि पंचायत समितीच्या गणांची अंतिम रचनाही झाली आहे. मतदारसंख्येमध्ये सांगली जिल्हा राज्यात १० व्या स्थानी आहे. बीडमध्ये सर्वाधिक ५७ हजार ५६७, तर पुणे जिल्ह्यात सरासरी ४० हजार ८३३ मतदार आहेत. नजीकच्या सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांची सरासरी मतदारसंख्या सांगली जिल्ह्यापेक्षा जास्त आहे.

१८ लाख मतदारसंख्याजिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वाधिक मतदारांची संख्या पुरुषांची आहे. प्रारूप मतदार यादीनुसार एकूण मतदारसंख्या १८ लाख १२ हजार इतकी आहे. जिल्ह्याची मतदारसंख्या ३० लाखांवर असली, तरी त्यामधून महापालिका क्षेत्र व नगरपालिका, नगर परिषदा व नगर पंचायतींची सुमारे १२ लाख मतदारसंख्या वजा होते. उर्वरित १८ लाख मतदार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सदस्यांना निवडून देणार आहेत.

तालुकानिहाय गट अन् गण संख्यामिरज - ११ - २२वाळवा - ११ - २२जत - ९ - १८खानापूर - ४ - ८कवठेमहांकाळ - ४ - ८पलूस - ४ - ८कडेगाव - ४ - ८शिराळा - ४ - ८आटपाडी - ४ - ८तासगाव - ६ - १२

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli ZP Election: District ranks 10th in voter count.

Web Summary : Sangli Zilla Parishad election sees an average of 29,815 voters per group. With 61 groups and 1.8 million voters, Miraj, Walwa, and Jat are key for power.