शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
2
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
3
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
4
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
5
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
6
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
7
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
8
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
9
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
10
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
11
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
12
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
13
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
14
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
15
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
16
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
17
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
18
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
19
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
20
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषद गट, गणांची सोमवारी आरक्षण सोडत; इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 18:38 IST

पंचायत समित्यांची तालुक्याच्या ठिकाणी सोडत निघणार

सांगली : राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट आणि गणांची आरक्षण सोडत सोमवार, दि. १३ रोजी काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमानुसार, जिल्हा परिषदेच्या ६१ गटांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात तर दहा पंचायत समित्यांच्या १२२ गणांची आरक्षण सोडत संबंधित तहसीलदार यांच्या स्तरावर काढण्यात येणार आहे.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गातील व सर्वसाधारण महिलांसह आरक्षण सोडत दि. १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यासाठी दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता निश्चित केलेल्या ठिकाणी सभा होणार आहे. ज्या नागरिकांना या सभेला हजर राहायचे आहे, त्यांनी संबंधित ठिकाणी विहित वेळेत हजर राहावे, असे उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांनी कळविले आहे.जिल्हा परिषदेचे एकूण ६१ गट असून, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृह येथे सभा होणार आहे.पंचायत समितीनिहाय एकूण गण व सभेचे ठिकाण अनुक्रमे पुढीलप्रमाणे : आटपाडी ८ गणांची सोडत पंचायत समिती सभागृहात होणार आहे. जत १८ गण असून, तहसील कार्यालय जतच्या आवारातील तलाठी भवन. खानापूर ८ गण, बैठक सभागृह, तिसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विटा. कडेगाव ८ गण, बैठक सभागृह, तहसील कार्यालय, तासगाव १२ गण, शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कवठेमहांकाळ ८ गण, आर. आर. (आबा) पाटील सभागृह. पलूस ८ गण, तहसील कार्यालय. वाळवा २२ गण, लोकनेते राजारामबापू नाट्यगृह, इस्लामपूर. शिराळा ८ गण, प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय. मिरज २२ गण, वसंतरावदादा पाटील सभागृह, पंचायत समिती येथे आरक्षण सोडत निघणार आहे.

पंचायत समिती सभापतींची आज आरक्षण सोडतजिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांमधील सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Zilla Parishad: Lottery for groups, constituencies on Monday.

Web Summary : Sangli Zilla Parishad's group and constituency reservation lottery will be held Monday. The draw for 61 groups will be at the Collector's office, and 122 constituencies at the Tahsildar's office. Panchayat Samiti chairman reservation draw today.