शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
4
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
5
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
6
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
7
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
8
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
9
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
10
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
11
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
12
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
13
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
14
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
15
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
16
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
17
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
18
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
19
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
20
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषदेने निधी खर्च न केल्याने विभागीय आयुक्तांकडून झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 18:21 IST

१९९० पासूनची अपहार प्रकरणे अनिर्णित, तातडीने फौजदारीचे आदेश; जिल्हा परिषद व्याजावर जगू नये

सांगली : जिल्हा परिषदेकडे पैसे असूनही ते खर्च होत नसल्याबद्दल पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नाराजी व्यक्त केली. ही बाब चुकीची असल्याचे सांगत ग्रामपंचायत विभागाच्या कामकाजाबाबत असमाधान व्यक्त केले.जिल्हा परिषदेत शुक्रवारी आयुक्त तपासणीचे चार वर्षांचे अहवाल वाचन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर आयुक्त (आस्थापना) नितीन माने, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्रभारी अपर आयुक्त रवींद्र कणसे, प्रभारी सहायक आयुक्त विजय धनवटे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेतील विविध यंत्रणांचे विभागप्रमुख, गटविकास अधिकारी यांनी आपापल्या विभागाचा आढावा सादर केला.ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी आपल्या विभागाचा आढावा सादर करताना अपहाराची ३९ प्रकरणे चाैकशीच्या प्रक्रियेत असल्याचे सांगितले. १९९० पासूनच्या या प्रकरणात पैसे येणे असल्याचे सांगितले. त्यावर डॉ. पुलकुंडवार म्हणाले, ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण, दप्तर तपासणी वेळच्या वेळी करायला हवी. शासनाच्या पैशाचा अपहार सहन केला जाणार नाही. अपहार दिसताच तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करा. अनेक ग्रामपंचायती बेअरर चेक देतात. ते पूर्णत: चुकीचे आहे. ते तत्काळ बंद करा. हा प्रकार अजिबात चालणार नाही. घटनात्मक तरतुदीनुसार आलेला निधी १०० टक्के खर्च झालाच पाहिजे. महिला, अनुसूचित घटक, दिव्यांग यांचा निधी खर्च झालाच पाहिजे.यावेळी डॉ. पुलकुंडवार यांनी आरोग्य सुविधा, शिक्षण, ग्रामीण स्वच्छता, पाणीपुरवठा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आदी कामांचाही आढावा घेतला. आक्षेप नीट तपासून कार्यवाहीची सूचना केली. कार्यालय तपासणी अहवालाचे वाचन अपर आयुक्त नितीन माने यांनी केले.

पाच वर्षांपूर्वीचा वित्त आयोगही अखर्चितडॉ. पुलकुंडवार म्हणाले, सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील निधी सन २०२५-२६ मध्ये खर्च होऊन उपयोग नाही. विविध प्रवर्गांसाठीचा राखीव निधी अन्य कामांसाठी खर्च होता कामा नये. वित्त आयोगातून २०२०-२१ मध्ये १५० कोटी रुपये आले, पण त्यातही निधी शिल्लक राहणे ही बाब योग्य नाही. १४ व्या वित्त आयोगाचे ३८ लाख, तेराव्या आयोगाचे ७८ लाख शिल्लक आहेत. हे प्रशासनाच्या कार्यक्षम कारभाराचे निदर्शक नाही.

जिल्हा परिषद व्याजावर जगू नयेडाॅ. पुलकुंडवार म्हणाले, शासनाकडून विविध योजनांसाठी आलेला निधी वेळेत खर्च न झाल्याने बँकेत पडून राहतो. त्याच्या व्याजावर जिल्हा परिषद जगणे योग्य नाही. व्याज मिळते म्हणून पैसे बँकेत ठेवू नका. तो ज्या-त्या विकासकामांसाठी खर्च झालाच पाहिजे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Zilla Parishad funds unspent; Divisional Commissioner demands explanation.

Web Summary : Divisional Commissioner expressed displeasure over Sangli Zilla Parishad's unspent funds. He criticized delays in Gram Panchayat audits and demanded immediate action against corruption. He emphasized timely fund utilization for development, especially for women, Scheduled Castes, and the disabled, and cautioned against relying on interest income.