Sangli: सांगलीत बाल निरीक्षण गृहातून दोन मुलांना पळवले; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
By शरद जाधव | Updated: October 27, 2023 22:57 IST2023-10-27T22:57:16+5:302023-10-27T22:57:46+5:30
Sangli News: सांगली शहरातील कर्मवीर चौकाजवळ असलेल्या दादूकाका भिडे बालगृह निरीक्षण गृहात असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना फूस लावून पळविण्यात आल्याचा प्रकार घडला.

Sangli: सांगलीत बाल निरीक्षण गृहातून दोन मुलांना पळवले; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
- शरद जाधव
सांगली - शहरातील कर्मवीर चौकाजवळ असलेल्या दादूकाका भिडे बालगृह निरीक्षण गृहात असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना फूस लावून पळविण्यात आल्याचा प्रकार घडला. यातील १२ वर्षीय मुलगा खानापूर तालुक्यातील तर दुसरा बोडनी (ता. अलिबाग) येथील आहे. गुरुवारी रात्री आठ ते शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे निरीक्षण गृहाचे काळजी वाहक विजय बाळू माळी यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भिडे निरीक्षण गृहात अल्पवयीन मुलांना ठेवण्यात येते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने या बालगृहात असणारे खानापूर तालुक्यातील बलवडी आणि रायगड जिल्ह्यातील बोडनी येथील या मुलांना कशाचेतरी आमिष दाखवून त्यांना फूस लावून पळवून नेले. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. यानंतर फिर्यादी माळी यांनी त्या अल्पवयीन मुलांचा सर्वत्र शोध घेतला मात्र, ते कोठेही मिळाले नाहीत. अखेर माळी यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली.