सांगली :  महिलांच्या टोळीने मिरजेत एका रात्रीत फोडली तीन दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:09 IST2019-01-03T15:58:22+5:302019-01-03T16:09:00+5:30

सहा महिलांच्या टोळीने गुरुवारी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान तीन दुकाने फोडून सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास केला.

Sangli: Three shops in a night in Miraj | सांगली :  महिलांच्या टोळीने मिरजेत एका रात्रीत फोडली तीन दुकाने

सांगली :  महिलांच्या टोळीने मिरजेत एका रात्रीत फोडली तीन दुकाने

ठळक मुद्देमहिलांच्या टोळीने मिरजेत एका रात्रीत फोडली तीन दुकानेदीड लाखाची रोकड लंपास : सीसीटिव्ही फुटेजमध्ये चोरीचा प्रकार स्पष्ट

सांगली : सहा महिलांच्या टोळीने गुरुवारी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान तीन दुकाने फोडून सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास केला.

एसटी स्टँड परिसर व लक्ष्मी मार्केट परिसरातील दोन मेडिकल, माधव थिएटरजवळ झिनत कापड दुकान अशी तीन दुकाने फोडली. सर्व दुकानांमधील दीड लाख रोकड लंपास करण्यात आली.

दुकानाच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये चोरी करणाऱ्या सहा महिलांची टोळी दिसून आली आहे. पोलिसांनी नाकाबंदी करून शोध सुरू ठेवला आहे

Web Title: Sangli: Three shops in a night in Miraj