शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
2
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
3
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
4
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
5
सुनेवर अत्याचार, पतीचं बाहेर अफेअर; दीप्तीच्या भावाने 'कमला पसंद'च्या मालकाच्या कुटुंबावर केले आरोप!
6
बाजारात 'सुपर फास्ट' कमबॅक! बजाज-रिलायन्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी; फक्त २ स्टॉक्स घसरले
7
चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन
8
घरासाठी कर्ज घेण्यास लोकांचा सरकारी बँकांवर जास्त भरोसा; ४० टक्के कर्ज ७५ लाखांपेक्षा अधिक
9
MCX च्या शेअरनं गाठला ₹१०,२५० चा उच्चांकी स्तर; ₹१२,५०० पर्यंत जाऊ शकतो भाव, काय म्हणाले एक्सपोर्ट
10
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
11
'टेस्ला मॉडेल Y' भारतात २० लाखांनी स्वस्त होणार? कंपनीचा मोठा दावा, किंमत नाही, मालकी खर्च कमी होणार...
12
अल-कायदाचा कमांडर; पाकिस्तानमध्ये लपलाय हाफिज सईदपेक्षा मोठा दहशतवादी, अमेरिकेच्या टार्गेटवर!
13
FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
14
चेतेश्वर पुजाराच्या मेव्हण्याने संपवलं जीवन, जिच्याशी ठरलेलं लग्न तिनेच केलेले 'तसले' आरोप
15
इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? अफगाणी मीडियाचा मोठा दावा, पाकिस्तानात खळबळ...
16
जय श्रीराम! सर्वांत श्रीमंत मंदिरांच्या यादीत राम मंदिर, किती कोटींची झाली कमाई? आकडे पाहाच
17
१२ महिन्यांमध्ये २९,००० अंकांच्या पार जाणार निफ्टी? रिकव्हरीच्या ट्रॅकवर जातोय का इंडेक्स?
18
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
19
बायकोची हत्या केल्याच्या आरोपाखाली पती चार महिने तुरुंगात अन् पत्नी दिल्लीत प्रियकरासोबत आनंदात!
20
लष्करात सैनिकांची कमतरता! आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती केली होणार
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून पंधरा तोळे सोने केले लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 15:46 IST

शिराळा : येथील बाह्यवळण रस्त्यावरील सुरेल वस्तीवर सोमवारी, (दि.२४) भर दुपारी एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ...

शिराळा : येथील बाह्यवळण रस्त्यावरील सुरेल वस्तीवर सोमवारी, (दि.२४) भर दुपारी एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल साडे पंधरा (१५.४०) तोळे सोन्याचे दागिने आणि रोख पंचवीस हजार रुपये असा अंदाजे वीस लाख रुपयांचा ऐवज लंपास नेला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तुकाराम निवृत्ती रोकडे (वय ७६) हे आपल्या पत्नी कमल रोकडे यांच्यासह सुरेल वस्तीवर राहतात. त्यांचा मुलगा विजय रोकडे हे मुंबई येथे कुटुंबासह राहतात. सोमवारी शिराळा येथे बाजार असल्याने तुकाराम रोकडे हे वीज बिल भरण्यासाठी आणि बाजारासाठी दुपारी एक वाजता घराला कुलूप लावून बाहेर पडले होते. जाताना त्यांनी कुलूपाची चावी वऱ्हांड्यात अडकवलेल्या जुन्या कपड्यांमध्ये ठेवली होती. दरम्यान, त्यांची पत्नी कमल रोकडे या शेतात भांगलणीच्या कामासाठी गेल्या होत्या.रोकडे हे बाजारात असताना त्यांचे जावई दिलीप आनंदा पवार भेटले. दिलीप पवार यांनी 'मी रात्री मुंबईला ट्रॅव्हल्सने जाणार आहे. बाजारातून घेतलेली पिशवी घरात ठेवून येतो,' असे सांगितले. दिलीप पवार घरी गेले असता, त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले आणि ते कोचावर पडलेले होते. त्यांनी लगेच तुकाराम रोकडे यांना याची माहिती दिली.घरी परत आल्यावर रोकडे यांनी पाहणी केली असता, लोखंडी कपाटातील पाटल्या, मंगळसूत्र, नेकलेस, तीन चेन, पाच अंगठ्या, कर्णफुले आणि इतर दागिने असे एकूण १५.४० तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख २५,००० रुपये असा मोठा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याप्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Daylight robbery at locked house, gold worth lakhs stolen.

Web Summary : In Shirala, thieves broke into a locked house in broad daylight, stealing 15.4 tolas of gold jewelry and ₹25,000 in cash, totaling approximately ₹20 lakhs. Police are investigating the brazen theft that has instilled fear in residents.