शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

सांगली : पंचायत राज समिती दौऱ्यासाठी शिक्षक, ग्रामसेवकांकडून घेतले पैसे, शेतकरी संघटनेचा आरोप : प्रकरणाच्या चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 3:52 PM

पंचायत राज समितीचा दौरा असल्याचे सांगून जिल्हा परिषदेतील काही अधिकाºयांनी प्राथमिक शिक्षक व ग्रामसेवकांकडून बेकायदेशीररित्या पैसे घेतले आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे सुनील फराटे यांनी गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याकडे केली आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देशिक्षक, ग्रामसेवकांकडून पैसे घेताना वर्गवारी सर्वाधिक पैसे तासगाव तालुक्यातील शिक्षकांकडून घेण्यात आलेग्रामसेवकांकडूनही पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या नावावर पैसे गोळा जिल्हा परिषद सभेतही संताप

सांगली : पंचायत राज समितीचा दौरा असल्याचे सांगून जिल्हा परिषदेतील काही अधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षक व ग्रामसेवकांकडून बेकायदेशीररित्या पैसे घेतले आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे सुनील फराटे यांनी गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवकांकडून पैसे घेताना वर्गवारी करण्यात आली होती. सर्वाधिक पैसे तासगाव तालुक्यातील शिक्षकांकडून घेण्यात आले.

येथील शिक्षकांकडून प्रत्येकी चारशे रुपये, वाळवा तालुक्यातील शिक्षकांकडून प्रत्येकी शंभर, पलूसमधून प्रत्येकी शंभर असे प्रत्येक तालुकानिहाय वेगवेगळ््या रकमा घेतल्या आहेत. याशिवाय जिल्ह्यातील ग्रामसेवकांकडूनही पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या नावावर पैसे गोळा करण्यात आले आहेत.

वास्तविक पंचायत राज समितीच्या दौऱ्याचा संपूर्ण खर्च जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून करण्यात आला आहे. तरीही शिक्षक व ग्रामसेवकांकडून अशाप्रकारचे बेकायदेशीर पैसे गोळा का करण्यात आले.

या पैशाची कोणतीही पावती संबंधितांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सुनील फराटे यांनी केली आहे. शेतकरी संघटनेच्या या आरोपामुळे जिल्हा परिषद प्रशासन आणखी अडचणीत आले आहे.जिल्हा परिषद सभेतही संतापपंचायत राज समितीच्या दौऱ्यासाठी स्वीय निधीतून १८ लाखाचा खर्च दाखविण्यात आला आहे. सांगलीतील दोन दिवसाच्या दौऱ्याचा हा खर्च प्रचंड असून यात गोलमाल असल्याचा संशय विरोधी सदस्यांनी नुकत्याच झालेल्या सभेत व्यक्त केला होता. याप्रकरणी त्यांनी चौकशीची मागणीही केली होती. बहुमताने खर्चाच्या मंजुरीचा हा विषय मंजुर करण्यात आला आहे.इतकी आहे संख्याजिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची संख्या जवळपास ६ हजाराच्या घरात आहे. ग्रामसेवक पाचशेच्या घरात आहेत. यांच्याकडून रक्कम घेतल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप या आकडेवारीकडे पाहून गंभीर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष याची कितपत दखल घेणार याकडे शेतकरी संघटनेचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद