सांगलीतून स्लॅबच्या आणखी २४० प्लेटा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:33 IST2018-12-10T13:30:43+5:302018-12-10T13:33:26+5:30
कर्नाळ रस्त्यावर खुनाचा बनाव करणाऱ्या कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील संतोष जाधव याचे अटकेत असलेते दोन साथीदार अमित साताप्पा गोंधळी (वय २५) व अविनाश साताप्पा गोंधळी (२०, दोघे रा. तेरवाड, ता. शिरोळ) यांच्याकडून स्लॅबच्या आणखी २४० प्लेटा जप्त करण्यात आल्या आहेत.

सांगलीतून स्लॅबच्या आणखी २४० प्लेटा जप्त
सांगली : कर्नाळ रस्त्यावर खुनाचा बनाव करणाऱ्या कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील संतोष जाधव याचे अटकेत असलेते दोन साथीदार अमित साताप्पा गोंधळी (वय २५) व अविनाश साताप्पा गोंधळी (२०, दोघे रा. तेरवाड, ता. शिरोळ) यांच्याकडून स्लॅबच्या आणखी २४० प्लेटा जप्त करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर रस्त्यावरील भंगार बाजारात त्यांनी या प्लेटा विकल्या होत्या. दरम्यान मुख्य संशयित जाधव अजूनही पसारच आहे.
गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच संतोष जाधव पसार झाला. त्याचे साथीदार अमित व अविनाश गोंधळी या दोघांना अटक केली. आतापर्यंत सांगली, मिरज व इचलकरंजीतून १ हजार ९४ प्लेटा जप्त केल्या आहेत. संजयनगर पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर गोंधळी बंधूंना मिरज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.