शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : प्रजासत्ताक दिनी भाजप आणि कॉंग्रेस आमने-सामने, कॉंग्रेसचा मोर्चा, भाजपची तिरंगा यात्रा,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 18:43 IST

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनंतर पुन्हा एकदा भाजप आणि कॉंग्रेस प्रजासत्ताक दिनानिमित्त आमने-सामने येत आहेत. कॉंग्रेसने धर्मनिरपेक्षता धोक्यात आल्याच्या कारणास्तव संविधान मोर्चाचे तर भाजपने तिरंगा एकता यात्रेचे आयोजन केले आहे. दोन्ही पक्षातील दिग्गज नेते या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. कॉंग्रेसने संपूर्ण राज्यभरात संविधान बचाव मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देनोटाबंदीच्या वर्षपूर्तीनंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आमने-सामनेप्रजासत्ताक दिनानिमित्त दोन्ही पक्षातील दिग्गज नेते सहभागी होणारवारंवार होतोय सामना

सांगली : नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनंतर पुन्हा एकदा भाजप आणि कॉंग्रेस प्रजासत्ताक दिनानिमित्त आमने-सामने येत आहेत. कॉंग्रेसने धर्मनिरपेक्षता धोक्यात आल्याच्या कारणास्तव संविधान मोर्चाचे तर भाजपने तिरंगा एकता यात्रेचे आयोजन केले आहे. दोन्ही पक्षातील दिग्गज नेते या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.कॉंग्रेसने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जातीयवादामुळे देशातील आणि राज्यातील वातावरण भीतीयुक्त बनले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या काही निर्णयांमुळे भारतीय राज्यघटनेला धक्का बसेल, अशी शंका सामान्य जनतेमध्ये निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा विचार करून कॉंग्रेसने संपूर्ण राज्यभरात संविधान बचाव मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे.

सांगली जिल्हा व शहर कॉंग्रेसतर्फे २६ जानेवारी रोजी दुपारी अडिच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यास अभिवादन करून मोर्चास सुरुवात होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ््यास अभिवादन करून हा मोर्चा स्टेशन चौकात येईल. त्याठिकाणी सभेद्वारे या संविधान मोर्चाची सांगता केली जाणार आहे, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली.भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात गुरुवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये प्रजासत्ताक दिनी तिरंगा एकता यात्रेचे आयोजन करण्याचा निर्णय झाला. प्रसंगी दुचाकी रॅलीही काढण्यात येईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या यात्रेचे नेतृत्व सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीरदादा गाडगीळ आदी नेते करणार आहेत.यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सामाजिक एकोपा बाळगणे, सामाजिक न्यायाप्रती वचनबद्धता आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना हाच धर्म मानून कार्यरत राहणे हा संदेश देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्यालयापासून ही यात्रा निघून सांगलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करून स्टेशन चौकात राज्य घटनेच्या प्रस्तावनेचे सामुहिक वाचन करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता आ. गाडगीळ यांच्या कार्यालयापासून सुरु होणाºया या यात्रेत सर्व नागरिकांनी सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.वारंवार होतोय सामनायापूर्वी नोटाबंदीच्या वर्षपूर्तीवेळी कॉंग्रेसने नोटांचे श्राद्ध आंदोलन घेतले होते. त्याचवेळी भाजपने काळापैसा विरोधी दिन साजरा केला होता. आता पुन्हा दोन्ही पक्ष आमने-सामने येत आहेत.

टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८Sangliसांगलीcongressकाँग्रेसBJPभाजपा