प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारत दाखवणार 'रुद्रा'वतार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 05:57 PM2018-01-25T17:57:12+5:302018-01-25T17:59:30+5:30

भारताच्या 69व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साह असून, राजपथावर भारतीय लष्कराचे तिन्ही दल संचलन करणार आहेत.

republic day 2018 mi 17 and rudra helicopter to be part of rday parade | प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारत दाखवणार 'रुद्रा'वतार

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारत दाखवणार 'रुद्रा'वतार

Next

नवी दिल्ली- भारताच्या 69व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साह असून, राजपथावर भारतीय लष्कराचे तिन्ही दल संचलन करणार आहेत. या संचलनात हवाई दलाच्या थक्क करणा-या कसरती पाहायला मिळणार आहेत. या संचलनात भारतीय बनावटीच्या रुद्र या हेलिकॉप्टरचा थरार अनुभवता येणार आहे.

भारतीय हवाई दलाचं लढाऊ हेलिकॉप्टर रुद्र पहिल्यांदाच या संचनलात दिसणार आहेत. हवाई दलातर्फे करण्यात येणा-या संचलनात 21 लढाऊ विमानं, 12 हेलिकॉप्टर, 5 ट्रान्सपोर्टर सहभागी होतील, अशी माहिती हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन राहुल भसीन यांनी दिली आहे. या संचलनात आसियानच्या झेंड्यासह एक Mi-17 V5 हे विमानंही सहभागी होणार आहे.

19 ते 30 जानेवारीदरम्यान आसियान संमेलनाचं आयोजन करण्यात येणार असून, या समारंभात आसियान देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार आहेत. या संचनलात गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त विमानं सहभाग नोंदवणार आहेत. यात 8 सुखोई-30 विमानं, 5 एमआय-17 हेलिकॉप्टर्स, 4 ध्रुव हेलिकॉप्टर्स, 3 रुद्र अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर, 1 अवेक्स, 3 तेजस, 5 जग्वार, 5 मिंग-29, 3 सी-130 हर्क्युलस, 1 ग्लोब मास्टर सी-17 सहभागी होणार आहेत. 
रुद्र हेलिकॉप्टरमध्ये काय आहे विशेष ?
रुद्र हेलिकॉप्टर हे आक्रमक हेलिकॉप्टर म्हणून ओळखलं जातं. भारतीय बनावटीच्या या हेलिकॉप्टरच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला कॅमेरे बसवण्यात आले असून, हे कॅमेरे रात्र, दिवस किंवा वातावरण खराब असलं तरी शत्रूवर अचूक लक्ष ठेवून असतात. या हेलिकॉप्टरमध्ये बसवण्यात आलेली गन वैमानिकाच्या हेल्मेटसारखी फिरणार आहे. अशा परिस्थितीत पायलटला शत्रूला टार्गेट करणं सोपं जाणार आहे. रुद्रमध्ये एमएम टार्गेट अजूक टिपणा-या गनबरोबरच हवेतल्या हवेत शत्रूला लक्ष्य करण्यासाठी मिसाइलही बसवण्यात आली आहेत. तसेच या हेलिकॉप्टरच्या दिशेनं येणा-या मिसाइलला निष्क्रिय करण्याची रुद्र हेलिकॉप्टरमध्ये क्षमता आहे. रुद्रमध्ये एका वेळी दोन वैमानिक बसू शकतात, त्या हेलिकॉप्टरमध्ये 14 लोकांची आसन व्यवस्था आहे. 

Web Title: republic day 2018 mi 17 and rudra helicopter to be part of rday parade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.