पश्चिम बंगालमध्ये महिलांशी गैरवर्तनाचा सांगलीत निषेध, महालक्ष्मी प्रतिष्ठानची निदर्शने
By अविनाश कोळी | Updated: July 9, 2024 19:42 IST2024-07-09T19:41:13+5:302024-07-09T19:42:05+5:30
सांगली : पश्चिम बंगालमधील महिलांशी असभ्य वर्तन होत असल्याच्या घटनेचा निषेध करीत महालक्ष्मी प्रतिष्ठानच्यावतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात ...

पश्चिम बंगालमध्ये महिलांशी गैरवर्तनाचा सांगलीत निषेध, महालक्ष्मी प्रतिष्ठानची निदर्शने
सांगली : पश्चिम बंगालमधीलमहिलांशी असभ्य वर्तन होत असल्याच्या घटनेचा निषेध करीत महालक्ष्मी प्रतिष्ठानच्यावतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
महालक्ष्मी प्रतिष्ठानच्यावतीने तहसिलदार लिना खरात यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम बंगालमधीलमहिलांशी सरकारकडून गैरवर्तन होत आहे. महिला मुख्यमंत्री असतानाही महिलांशी असभ्य वर्तन होत असल्याने आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करीत आहोत. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कारवाई करावी. कुच बिहार आणि दिनाजपूर इथे झालेल्या घटना अत्यंतिक वेदनादायक आहेत. या घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत.
देशाच्या गृहमंत्र्यांनी याची चौकशी करुन प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचावे. तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुखदा गाडगीळ, सचिव सुमित्रीताई फाटक, कल्याणी गाडगीळ, वर्षा चापोरकर, माजी नगरसेविका अनुराधा मोडक आदी उपस्थित होते.