शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

चांदोली धरणावर सांगली पोलिसांचे मॉक ड्रिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 16:04 IST

वारणावती : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांच्या वतीने शुक्रवार, दि. ९ रोजी युद्धजन्य परिस्थितीचे ‘मॉक ड्रिल’ ...

वारणावती : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगलीपोलिसांच्या वतीने शुक्रवार, दि. ९ रोजी युद्धजन्य परिस्थितीचे ‘मॉक ड्रिल’ घेण्यात आले. यावेळी युद्धजन्य परिस्थिती कशी हाताळायची याची रंगीत तालीम व आपत्कालीन यंत्रणांची तयारी तपासण्यात आली.या रंगीत तालमीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ११ ते दुपारी २ या वेळेत चांदोली धरण ब वर्ग मर्मस्थळ येथे असणाऱ्या जलविद्युत निर्मिती प्रकल्प या ठिकाणी बॉम्ब डिस्पोजल व मॉक ड्रिल घेण्यात आले. वारणा धरण क्षेत्रात धरणावर तालुका दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत शिराळा तालुक्यातील महसूल, पोलिस प्रशासन, पाटबंधारे, अग्निशमन दल, आदी प्रमुख विभागांच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत मॉक ड्रिल झाला. यावेळी अग्निशमन दलासह आरोग्य विभागाचे वाहनही सज्ज ठेवण्यात आले होते.या मॉक ड्रिलसाठी १४ पोलिस अधिकारी व ६५ पोलिस अंमलदार तसेच सीआयडीचे २ अधिकारी, आयबीचे २ अधिकारी, एटीएसचे एक अधिकारी व २ अंमलदार, सुरक्षा शाखेचे १ अधिकारी व ०२ अंमलदार, क्यूआरटीचे ०१ अधिकारी १० अंमलदार, बीडीडीएसचे ०१ अधिकारी ०६ अंमलदार यांच्यासह शिराळा तहसीलदार, तीन महसूल कर्मचारी, ३ ॲम्ब्युलन्स, २ डॉक्टर १२ मेडिकल स्टाफ, शिराळा नगरपंचायतीचे २ कर्मचारी, इस्लामपूर नगरपालिका येथील फायर ब्रिगेडसह ४ कर्मचारी, पाटबंधारे विभागाचे २ कर्मचारी, आदी मनुष्यबळ वापरण्यात आले. तसेच १ फायर ब्रिगेड, ३ ॲम्ब्युलन्स, चारचाकी ६ सरकारी वाहने दोन दुचाकी वापरण्यात आल्या. यावेळी तहसीलदार शामला खोत-पाटील, उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण, शिराळा पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, कुरळप पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक विक्रम पाटील, कोकरूड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जयवंत जाधव यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणPoliceपोलिस