शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका 'स्थायी'च्या बजेटमध्ये योजनांची खैरात, आयुक्तांच्या अंदाजपत्रकात ९३ कोटींची वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 19:02 IST

महासभा तहकूब, एक एप्रिलला होणार चर्चा

सांगली : महापालिका क्षेत्रातील नागरिकांवर कोणतीही करवाढ न करता २०२६-२७ या वर्षाचा १ हजार १७३ कोटी ६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती अतुल माने यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे सादर केला. यात क्रीडांगणाचा विकास, मोक्यांच्या जागी फुडपार्क, मुख्य रस्त्यावर स्वागत कमानी, साई व शिवसृष्टी, वाचनालय, भाजी मंडई, संग्रहालय अशा विविध योजनांची खैरात करण्यात आली आहे.या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी सदस्यांना तीन ते चार दिवसांचा कालावधी द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्यासह सर्वच पक्षांच्या गटनेत्यांनी केली. त्यानुसार महापौर सूर्यवंशी यांनी आजची सभा तहकूब करीत १ एप्रिल रोजी अर्थसंकल्पावर चर्चेसाठी सभा घेण्याचे जाहीर केले.स्थायी समिती सभापती अतुल माने यांनी महापालिकेचे २०२६-२७ चे बजेट सर्वसाधारण सभेला सादर केले. आयुक्त सत्यम गांधी १ हजार ६५ कोटींचे बजेट सादर केले होते. त्यात ९३ कोटीची वाढ करून १,१७३ कोटी जमेचे, १११६ कोटी खर्चाचे व ४६ कोटी ३० लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मांडला.

घरपट्टीच्या उत्पन्नात १६.६६ कोटी, नगररचना २.७५ कोटी, रस्ते, चर दुरुस्ती १४ कोटी, जमीन व बिनशेतीसारा मुद्रांक अनुदान १ कोटी, खुल्या जागांपासूनचे उत्पन्न १ कोटी, मीटरने पाणी पुरविलेला आकार ६ कोटी यासह मक्तेदार नोंदणी शुल्क, जलसिंचन शुल्क, प्रवेश फी, विलंब आकार, रस्ता खुदाई आकार यातून ४४.६० कोटींची वाढ अपेक्षित धरली आहे. तसेच अमृत ३.० योजनेतून ५० कोटींचे अनुदान अपेक्षित आहे.

अर्थसंकल्पात काय?क्रीडांगणासाठी ८.९० कोटीशहरात नवीन क्रीडांगण विकसित करण्यासह खेळाडूंना सोयी-सुविधा देण्यासाठी ८ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या मागील ११ एकर जागेत नवीन क्रीडांगण उभारण्याचा संकल्प केला आहे.शहरात व्यसनमुक्ती केंद्रमहापालिका क्षेत्रातील तरुणाईमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे. तरुणाईला व्यसनापासून मुक्त करण्यासाठी शहरात व्यसनमुक्ती केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.मदनभाऊ महाकरंडक नाट्य स्पर्धामहापालिकेच्यावतीने २०१६ पासून दिवगंत मदनभाऊ पाटील महाकरंडक नाट्य स्पर्धा घेतली जात होती. पण प्रशासकीय काळात या स्पर्धेला ब्रेक लागला होता. आता पुन्हा ही स्पर्धा सुरू करण्यात आली असून त्याच्यासाठी १० लाख रुपयांची तरतूद केली आहे.नावीन्यपूर्ण योजनेतून संग्रहालयसध्या सांगलीत एक संग्रहालय आहे. आता महापालिकेच्यावतीने नवीन संग्रहालय उभारले जाणार आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आंबेडकर यांचे कार्य समाजसमोर आणण्याचा प्रयत्न राहणार आहे.तिन्ही शहरात भाजी मंडईसांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहराच्या विस्तारित भागात भाजी मंडई उभारली जाणार आहे. मंगळवार बाजार, कुपवाडमधील मदनभाऊ आरोग्य केंद्राजवळ आणि मिरजेतील पंढरपूर रोड येथे भाजीमंडई विकसित करण्यात येईल.साईसृष्टी व शिवसृष्टीशहरातील चाणक्यपुरी येथील एक एकर जागेत साईसृष्टी तर लक्ष्मी मंदिर परिसरातील अजिंक्य सोसायटीच्या अर्धा एकर जागेत शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे.मोक्याच्या जागेवर फुडपार्क, शाॅपिंग काॅम्पलेक्सशहरातील ८० व शंभरफुटी रस्त्यालगतच्या मोक्याच्या जागी फुडपार्क उभारण्यात येईल. तसेच हरभट रोड, कोल्हापूर रोड, माधवनगर रोड व विश्रामबाग चौकात शाॅपिंग काॅम्प्लेक्स उभारण्यासाठी २ कोटींची तरतूद केली आहे.चार ठिकाणी स्वागत कमानीमहापालिका क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या चारही रस्त्यावर स्वागत कमानी उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Corporation Budget: Plans announced, 93 crore increase.

Web Summary : Sangli Municipal Corporation's budget proposes developments like sports grounds, food parks, libraries and museums. No new taxes are proposed. The budget increased by 93 crores, focusing on infrastructure and cultural projects across Sangli, Miraj, and Kupwad.