शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli flood: कृष्णेच्या पुरावर १२ कॅमेऱ्यांतून महापालिकेची नजर, वॉररुम २४ तास सतर्क 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 18:58 IST

पूरबाधित नागरिकांना मदतीचा हात

सांगली : कृष्णा नदीचा वाढता धोका आणि कोयना-वारणाच्या विसर्गामुळे शहराला पुन्हा एकदा पुराचा फटका बसला. अशा परिस्थितीत महापालिकेची वाॅररूम पूर्ण क्षमतेने सज्ज होती. चोवीस तास कृष्णा नदीच्या पातळीवर १२ कॅमेऱ्यातून नजर ठेवण्यात आली. त्यामुळे दर तासाला नदीपात्राची पातळी किती वाढली, हे नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. वेळीच नागरिकांचे स्थलांतर करण्यात वाॅररूमला मोठा वाटा ठरला आहे.महापालिकेच्या मंगलधाम इमारतीत पाच वर्षांपूर्वी सिटी कमांड सेंटर सुरू करण्यात आले. २०१९ च्या महापुरानंतर पालिकेने नदीपात्रातील पाण्याच्या पातळीवर वाॅच ठेवण्यासाठी आयर्विन पूल, मिरज कृष्णा घाटावर सीसीटीव्ही बसविले. त्यानंतर पूरबाधित क्षेत्रासाठी प्राईड मल्टिप्लेक्ससह ११ ठिकाणी उच्च दर्जाचे कॅमेरे बसविण्यात आले. यातील दोन कॅमेरे पीडीझेड दर्जाचे असून त्यातून पूरबाधित ३ ते ४ किलोमीटरवर लक्ष ठेवता येते. सीसीटीव्हीद्वारे सतत डेटा संकलन करून थेट लक्ष ठेवण्यात येत आहे. सीसीटीव्हीद्वारे सतत डेटा संकलन करून थेट लक्ष ठेवण्यात येतंय.

वाॅररूममध्ये १२ सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल स्क्रीन, वायरलेस संदेशवहन व्यवस्था, इंटरनेट सुविधा आणि आपत्ती मित्र ॲप यांसारखी आधुनिक साधने उपलब्ध आहेत. नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीसाठी २४ तास टोल-फ्री क्रमांक कार्यरत आहे. आयर्विन पूल, सांगली व कृष्णाघाट-मिरज पूल येथे पाणी किती वाढले, याचा अंदाज नागरिकांना प्रत्येक तासाला आपत्ती मित्र ॲपवर मिळत आहे. आपत्ती कक्षाचे प्रमुख सहायक आयुक्त नकुल जकाते, प्रभारी अधीक्षक प्रमोद रजपूत, लिपिक बंदेनवाज पिरजादे, अनिता जाधव यांच्यासह ११ कर्मचारी चोवीस तास पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

कुठे आहेत कॅमेरे?आयर्विन पूल, अमरधाम स्मशानभूमी, दत्तनगर जॅकवेल, सांगलीवाडी, सूर्यवंशी प्लाॅट, बाळूमामा मंदिर कर्नाळ रोड, न्यू प्राईड मल्टिप्लेक्स, अग्निशमन कार्यालय स्टेशन चौक, टिंबर एरिया अग्निशमन कार्यालय, दत्त प्लाॅट कर्नाळ रोड, मिरज कृष्णा घाट, काळीवाट साईमंदिर

पाच वर्षांपासून कक्ष कार्यरत२०१९ मध्ये सांगली शहराला महापुराचा मोठा फटका बसला. कृष्णा नदीची पाणीपातळी ५७ फुटांवर गेली. लाखो लोक घरात अडकून पडले होते. त्यानंतर महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन केंद्रांतर्गत सिटी कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. कर्मवीर चौकातील मंगलधाम कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावर ३ हजार चौरस फूट जागेत अद्ययावत सुविधा असलेले वाॅररूम २० ऑक्टोबर २०२० पासून सुरू झाले.

दिवसभरात १०० काॅलवाॅररूमशी संपर्क साधण्यासाठी तीन फोन नंबर दिले आहेत. पुराच्या काळात गेल्या तीन दिवसांपासून दररोज १०० हून अधिक नागरिक वाॅररूमशी संपर्क साधून पुराच्या स्थितीची माहिती घेत आहेत. केवळ पुराच्या काळातच नव्हे तर इतरवेळीही काॅलसेंटरला नागरिक संपर्क करतात. कुठे झाड पडले, रस्ता घसरगुंड झाला, वीज पडली, अपघात झाला तरीही नागरिक वाॅररूमशी संपर्क करीत असल्याचे सहायक आयुक्त जकाते यांनी सांगितले.

महापालिका क्षेत्रातील पूरबाधित क्षेत्रात कॅमेरे बसविले आहेत. वाॅकीटाॅकीची व्यवस्था केली आहे. कमांड सेंटरमधून पुराच्या पातळीवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांना संपर्कासाठी तीन फोन नंबरही दिले आहेत. पुराची पातळी वाढल्यास संबंधित भागातील पालिका कर्मचाऱ्यांना सूचना देऊन नागरिकांचे स्थलांतर केले जात आहे. - सत्यम गांधी, आयुक्त, महापालिका