शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

सांगली महापालिकेची ४३ कोटींची मुद्दल मिळेना, २२६ पतसंस्थांसह अन्य संस्थाही पैशांच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 17:16 IST

सांगली : अवसायनातील वसंतदादा सहकारी बँकेत अडकलेल्या ४३ कोटींच्या ठेवी व त्यावरील १३ वर्षांचे व्याज अशी ३५६ कोटींची मागणी ...

सांगली : अवसायनातील वसंतदादा सहकारी बँकेत अडकलेल्या ४३ कोटींच्या ठेवी व त्यावरील १३ वर्षांचे व्याज अशी ३५६ कोटींची मागणी महापालिकेने सहकार विभागाकडे केली आहे. मात्र, बँकेच्या येणी व देणी यांचे प्रमाण पाहिल्यास महापालिकेला पूर्ण मुद्दल मिळणेही कठीण आहे. महापालिकेसह २२६ पतसंस्था, बाजार समिती कर्मचारी संस्थेसह अन्य काही संस्था ठेवींच्या प्रतीक्षेत आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थेने राष्ट्रीयकृत बँकेत पैसे ठेवण्याचा नियम असताना, महापालिकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी ४३ कोटींच्या ठेवी वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेत ठेवल्या. या बेकायदेशीर कृतीवरून त्यावेळी वादही निर्माण झाला होता. बँक अवसायनात गेल्यानंतर या ठेवी मिळण्याची वाट खडतर झाली. महापालिकेने यापूर्वी अनेकदा न्यायालयीन लढाईचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. मुळातच महापालिकेने या ठेवी नियमबाह्य पद्धतीने ठेवल्याने त्यांच्यावर लेखा परीक्षणात ताशेरेही ओढले होते. अशा स्थितीत एक तप या पैशांपासून महापालिकेला वंचित राहावे लागले आहे.महापालिका आयुक्तांनी व्याजासह संपूर्ण रकमेची मागणी केली असली, तरी प्रत्यक्षात अवसायनातील बँकेची स्थिती पाहिल्यास त्यांची संपूर्ण रक्कम मिळणे कठीण दिसत आहे. विनातारणी कर्जप्रकरणांमुळे ही बँक अवसायनात गेली. सद्य:स्थितीत शंभर कोटींवर कर्जाची रक्कम येणे बाकी दिसत असली, तरी त्यातील सुरक्षित म्हणजे तारणी कर्जाची रक्कम केवळ २५ कोटींच्या घरातच आहे. उर्वरीत ७५ ते ८० कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली कोणतेही तारण नसल्याने अशक्य दिसत आहे. नियमानुसार कर्ज वसुलीतून देणेकऱ्यांना समान वाटप केले जाते, अशा स्थितीत महापालिकेचा पाय खोलात गेल्याचे दिसत आहे.

निबंधकांच्या सूचनेप्रमाणेच रकमांचे वाटप केले जाते. उपलब्ध निधीनुसार ठेवीदारांना पैसे परत करण्यात येतील. - मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक तथा अवसायक, वसंतदादा बँक. 

महापालिकेच्या ठेवी प्राधान्याने परत कराव्यात, म्हणून आम्ही सहकार विभागाला नोटीस बजावली आहे. प्रसंगी आम्ही न्यायालयात दाद मागू. - शुभम गुप्ता, आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड महापालिका.

टॅग्स :Sangliसांगली