सांगली : मिरजेत ड्रेनेज पाईप बदलण्याच्या बहाण्याने एका भामट्याकडून अनेकांना गंडा घालण्यात आला आहे. याबाबत काही नागरिकांनी महापालिकेला माहिती दिली असून, सतर्कतेचे आवाहन केले आहे.शहरातील झारी बाग, चिवटे कॉलनी परिसरात या भामट्याने काहीजणांना गंडवल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने या परिसरातून फिरून `आपण महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचे कर्मचारी आहोत` असे सांगितले. `या परिसरातील लहान आकाराचे ड्रेनेज आउटलेट पाईप बदलून मोठे पाईप जोडण्याचे काम मला महापालिकेने दिले आहे` अशी बतावणी केली. `हे काम महापालिका करीत असली, तरी थोडे पैसे तुम्हालाच खर्च करावे लागतील. या पैशांची पावती दिली जाईल आणि नंतर महापालिकेकडून तुम्हाला त्याचा परतावा मिळेल` असा दावा केला.चिवटे कॉलनी परिसरातील अनेक घरांतील रहिवाशांना त्याने ही बतावणी केली. या कॉलनीच्या मागील बाजूच्या डॉ. परमशेट्टी रुग्णालय आणि अन्य काही रुग्णालयांतही या कामाची माहिती दिली.यातील काही रहिवासी त्याच्या बतावणीला फसले. काही पैसेदेखील दिले. मात्र, पैसे मिळाल्यानंतर तो गायब झाला. `एका तासात कामगार आणि जोडणीचे साहित्य घेऊन येतो` असे सांगून निघून गेला. या भामटेगिरीनंतर त्याने आणखी चलाखी केली. रस्त्यावरील कोणाचा तरी मोबाइल घेऊन त्यावरून रहिवाशांशी संपर्क केला.`मी अर्धा तासात येत आहे, तुम्ही घरीच थांबा` असे सांगितले. त्यावर रहिवाशांनी विश्वासदेखील ठेवला. पण, तो परतला नाही. काही वेळाने रहिवाशांनी संबंधित मोबाइलवर संपर्क केला असता, तो क्रमांक रस्त्याने जाणाऱ्या कोणातरी अनोळखी व्यक्तीचा असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लोकांच्या लक्षात आले.
सीसीटीव्ही चित्रण पोलिसांत दिलेया व्यक्तीचे चित्रण परिसरातील रुग्णालयांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये झाले आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांनी यासंदर्भात महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदविली आहे. कॅमेऱ्यातील चित्रणही दिले आहे. या भामट्याने नेमक्या किती रकमेची फसवणूक केली हे स्पष्ट झालेले नाही.
हा भामटा सावळ्या रंगाचा, मध्यम उंचीचा आणि लठ्ठ आहे. थोडासा लंगडत आणि डुलत चालतो. महापालिका क्षेत्रात ड्रेनेजची कामे सुरू असल्याच्या ठिकाणी तो भामटेगिरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी त्याच्या बतावणीला फसू नये. त्वरित पोलिस किंवा महापालिकेला कळवावे. - डॉ. हर्षद दिवेकर, मिरज
Web Summary : A conman in Miraj, posing as a municipal drainage worker, deceived residents by promising drainage pipe replacement with partial payment refunds. Several residents fell victim before realizing the scam. Police complaint lodged; investigation underway.
Web Summary : मिराज में एक धोखेबाज ने नगरपालिका के ड्रेनेज कर्मचारी के रूप में लोगों को धोखा दिया, आंशिक भुगतान वापसी के साथ ड्रेनेज पाइप बदलने का वादा किया। घोटाला पता चलने से पहले कई निवासी शिकार हो गए। पुलिस में शिकायत दर्ज; जांच जारी।