शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

सांगलीच्या खासदाराचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:14 PM

सांगली : संपूर्ण राज्यभरात लक्षवेधी ठरलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघातील लढतीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. तुल्यबळ उमेदवार, चुरशीने झालेला ...

सांगली : संपूर्ण राज्यभरात लक्षवेधी ठरलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघातील लढतीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. तुल्यबळ उमेदवार, चुरशीने झालेला प्रचार, दिग्गज नेत्यांची पणाला लागलेली प्रतिष्ठा, मतदानाचा वाढलेला टक्का यामुळे निकालाविषयीची उत्सुकता सर्वत्र दिसत आहे.सांगली लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात कधीही तिरंगी लढत झाली नाही. एकतर्फी किंवा दुरंगी असाच सामना येथील नागरिकांनी नेहमी अनुभवला होता. यंदा भाजपचे संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कॉँग्रेस, राष्टÑवादी आघाडीचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर असे तीन दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत. तिन्ही उमेदवारांच्या प्रचारसभांनी वातावरण तापविले होते. आरोप-प्रत्यारोप तसेच ताकदीचे प्रदर्शन करीत उमेदवारांनी, कार्यकर्त्यांनी तसेच राज्य व राष्टÑीय स्तरावरील नेत्यांनी रंग भरला होता. गत निवडणुकीत कॉँग्रेसचा बालेकिल्ला हस्तगत करीत भाजपने ताकद सिद्ध केली होती, मात्र मागील निवडणुकीत मोदी लाटेचा परिणाम असल्याचा आरोप विरोधकांनी भाजपवर केला आहे. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या ताकदीची परीक्षा यानिमित्ताने होत आहे. राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनीही त्यांचे राजकीय कौशल्य या निवडणुकीत पणाला लावले आहे. जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या ताकदीचा लेखाजोखा मांडण्याचे काम निकालातून होणार आहे.मतमोजणी प्रक्रिया चालते तरी कशी?सांगली : मतमोजणीची प्रक्रिया फेरीनिहाय अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने होत असते. त्यामुळे निकालाविषयी आणि प्रत्येक फेरीनिहाय येणाऱ्या आकडेवारीविषयी नेहमीच कुतूहल व्यक्त होत असते. ही प्रक्रिया नेमकी चालणार कशी, त्याला किती वेळ लागणार, याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.येथे होणार मतमोजणीमिरजेतील शासकीय धान्य गोदामात (सेंट्रल वेअर हाऊस) गुरुवारी सकाळी आठपासून मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. प्रशासनाकडून याची सर्व ती तयारी पूर्ण करण्यात येत आहे. यावेळी प्रथमच सैनिक मतदारांची मोजणी स्कॅनिंगद्वारे करण्यात येणार असल्याने मतमोजणीस विलंब लागणार आहेअशा होणार फेºयासहा विधानसभा मतदारसंघनिहाय २० टेबलांवर मतमोजणी होणार आहे. यात सर्वात कमी १५ फेºया जत मतदारसंघातील होतील, तर सर्वाधिक १८ फेºया खानापूर मतदारसंघातील होणार आहेत. एका फेरीमध्ये १२० मतदान केंद्रांची मतमोजणी होणार आहे. फेरीनिहाय निकाल अंतिम झाल्यानंतर ते घोषित केले जाणार आहेत.कर्मचारी व पोलीस बंदोबस्तमतमोजणीसाठी ५९२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीच्या संपूर्ण प्रक्रियेत सर्व कर्मचारी व पोलिसांसह २५०० अधिकारी, कर्मचाºयांचा मतमोजणी प्रक्रियेत सहभाग असणार आहे. निकाल ऐकण्यासाठी येणाºया कार्यकर्त्यांची जिल्हा क्रीडा संकुल परिसरात सोय केली आहे. सांगली-मिरज रोड परिसरातच सर्वांना थांबविण्यात येणार आहे.कधी लागणार निकालदुपारी चारपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होईल. मात्र, टपाली मतदानाची मोजणी, मतदान यंत्रांतील मतांची मोजणी व व्हीव्हीपॅट स्लिपांची मोजणी यामुळे रात्री १२ ते मध्यरात्री २ पर्यंत अंतिम अधिकृत निकाल जाहीर होऊ शकतो. त्याबरोबरच अ‍ॅपच्या माध्यमातूनही सर्वसामान्यांना निकाल पाहता येणार आहे.