शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

सांगली, मिरजेसह जिल्यात दीड वर्षात ४५० दुचाकी लंपास-चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 20:37 IST

सांगली : सांगली, मिरजेसह जिल्यात गेल्या दीड वर्षात दुचाकी चोरीच्या गुन्'ांचा आलेख नजरेत भरण्यासारखा आहे. विशेषत: घरासमोर लावलेल्या दुचाकीवर ‘डोळा’ ठेवून चोरटे मध्यरात्रीच्या

ठळक मुद्देघरासमोर लावलेल्या दुचाकीवर ‘डोळा’

सांगली : सांगली, मिरजेसह जिल्यात गेल्या दीड वर्षात दुचाकी चोरीच्या गुन्'ांचा आलेख नजरेत भरण्यासारखा आहे. विशेषत: घरासमोर लावलेल्या दुचाकीवर ‘डोळा’ ठेवून चोरटे मध्यरात्रीच्या सुमारास लंपास करीत आहेत. गेल्या दीड वर्षात साडेचारशे दुचाकी लंपास झाल्या आहेत. ग्रामीणपेक्षा शहरी भागातील चोरीचे हे प्रमाण अधिक असल्याचे पोलीस दप्तरीच्या नोंदीवरुन दिसून येते.

चित्रपटगृह, रुग्णालये, पार्किंगच्या ठिकाणाहून पूर्वी दुचाकी लंपास केल्या जात होत्या. मात्र गेल्या दीड वर्षापासून घरासमोर लावलेल्या दुचाकी लंपास होत आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे खुलेआम दुचाकी चोरत आहेत. दररोज एक तरी दुचाकी चोरीला गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात नोंद होत आहे.

शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर अनेकदा दिवसाकाठी तीन-चार दुचाकी चोरीला गेल्याच्या नोंदी होत आहे. त्या तुलनेत गुन्हे उघडकीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. एखादी टोळी पकडली जाते. त्यांच्याकडून पाच-सहा दुचाकी जप्त केल्या जातात. परंतु अनेकदा हे गुन्हे बाहेरील जिल्'ातून उघडकीस आलेले असतात. दुचाकी चोरीचे गुन्हे नोंद करण्यास पोलीस टाळाटाळ करायचे. कच्ची नोंद करून जबाबदारी झटकत होते. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी मात्र हे मोडीत काढून दुचाकी चोरीची पक्की नोंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे गुन्हे दाखल होऊ लागल्याने चोरीचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते.विमा काढण्याकडे ओढादुचाकी खरेदी करताना एक वर्षाचा विमा मिळतो; पण त्यानंतर अनेक दुचाकीस्वार विमा काढत नाहीत. पण दुचाकी चोरीच्या गुन्'ात वाढ होऊ लागल्याने विमा काढण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. पन्नास ते साठ हजार रुपयांचे वाहन चोरीला गेले तर काय करायचे? असा विचार करून लोक विम्यासाठी प्रत्येकवर्षी हजार ते दीड हजार रुपये खर्च करीत आहेत.दुचाकी जातात कुठे?चोरलेल्या दुचाकी जातात कुठे? असा प्रश्न पडत आहे. पूर्वीपासून दुचाकी चोरीचे गुन्हे वाढत आहेत. पण अलीकडे हे प्रमाण वाढले आहे. दुचाकी चोरली की, ती पाच-दहा हजार रुपयांना विक्री केली जात असे. मात्र सध्या दुचाकी चोरली की, तिचे सुटे भाग करुन विक्री केली जात आहे. यामध्ये फार मोठे ‘रॅकेट’ आहे, अशी चर्चा सुरू आहे. त्याद्दष्टीने तपास करण्यासाठी स्वतंत्र पोलीस पथक तैनात करण्याची गरज आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस